मुंबई, 7 जुलै : 14 वर्षांच्या लहान मुलाची भारताच्या सेलिंग टीममध्ये (Optimist World Sailing Championship 2021) निवड झाली आहे. मजुराचा मुलगा असलेला पडिडाला विश्वनाथ (Padidala Vishwanath) नेव्ही बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आयएनएस मांडवी, गोवाचा सगळ्यात लहान नाविक आहे. विश्वनाथ हा तीन भावांमध्ये सगळ्यात लहान असून त्याचे वडील हैदराबादमध्ये रोजंदारीवर काम करतात.
इंडिया टु़डेशी बोलताना विश्वनाथचे वडील साईडुलू म्हणाले, '20 वर्षांपूर्वी आम्ही पैसे कमावण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी घर सोडलं. आमच्या तीन मुलांमध्ये पडिडाला सगळ्यात मेहनती आहे, त्यामुळेच त्याची तेलंगणा रेसिडेन्शियल सोशल वेलफेयर स्कूलमध्ये निवड झाली. या शाळेत आयपीएस प्रविम कुमार यांनी पडिडालाचं कौशल्य हेरलं आणि त्याला योग्य पाठिंबा आणि मार्गदर्शन दिलं.'
साईडुलू बांधकामाच्या साईटवर काम करतात. भविष्यामध्ये पडिडालाचं स्वप्न व्यावसायिक नाविक व्हायचं आहे. वयाच्या 12 व्या वर्षी पडिडालाची नेव्ही बॉईज स्पोर्ट्स कंपनीने निवड केली, यानतंर त्याल योग्य मार्गदर्शन देण्यात आलं. एनबीएससीच्या संयुक्त विद्यमानाने इंडियन नेव्ही ऍण्ड स्पोर्ट्स अथॉरिटीने पडिडाला याचं ट्रेनिंग घेतलं आणि त्याला आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी तयार केलं.
2017 साली पडिडाला विश्वनाथ याने सब ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं. यानंतर तो आशावादींच्या राष्ट्रीय टीममध्ये निवडला गेला. विश्वनाथसारख्या प्रतिभा असणाऱ्या मुलांना जर योग्य ट्रेनिंग आणि मार्गदर्शन केलं गेलं तर त्यांची भविष्यात नक्कीच ऑलिम्पिकसाठी निवड होऊ शकते.
भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच सेलिंगमध्ये प्रतिनिधीत्व केलं. यावेळी पहिल्यांदाच टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) तीन सेलिंग स्पर्धांमध्ये भारताचे चार नाविक क्वालिफाय झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021