कुस्तीपटू राहुल आवारेचं मायदेशी जंगी स्वागत

कुस्तीपटू राहुल आवारेचं मायदेशी जंगी स्वागत

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेला राहुल आवारे याचं आज पुणे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी टिळक पगडी देऊन त्याचा सन्मान केल्यानंतर पुण्यातल्या अनेक तालमीतले मल्ल राहुलच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते.

  • Share this:

17 एप्रिल : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेला राहुल आवारे याचं आज पुणे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी टिळक पगडी देऊन  त्याचा सन्मान केल्यानंतर पुण्यातल्या अनेक तालमीतले मल्ल राहुलच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. राहुलचे आई वडीलही विमानतळावर उपस्थित होते.

राहुल आल्यानंतर त्याच्या आईने राहुलचं औक्षण केलं आणि त्याच्या फॅन्सनी एकच कल्ला केला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे विजयी झाला होता. त्यानं कुस्तीत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.५७ किलो पुरूष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या राहूल आवारेचा सामना कॅनडाच्या स्टिफन ताकाहाशीसोबत होता.

First published: April 17, 2018, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading