CWG 2018 : सुशीलकुमारला सुवर्णपदक, तर बबिता फोगटला रौप्य पदक

७४ किलो वजनी गटात सुशील कुमारने आपला दक्षिण आफ्रिकन प्रतिस्पर्धी सुशील कुमारवर अवघ्या १ मिनिट २० सेकंदात मात करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2018 03:15 PM IST

CWG 2018 : सुशीलकुमारला सुवर्णपदक, तर बबिता फोगटला रौप्य पदक

12 एप्रिल : भारताच्या सुशील कुमारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारने आपला दक्षिण आफ्रिकन प्रतिस्पर्धी सुशील कुमारवर अवघ्या १ मिनिट २० सेकंदात मात करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

सुशीलच्या कामगिरीने कुस्तीत भारताने आतापर्यंत ४ पदकं मिळवली आहेत. याचसोबत २९ पदकांसह भारताने पदकतालिकेत आपलं स्थान अजून भक्कम केलं आहे. राहुल आवारेपाठोपाठ सुशील कुमारनेही कुस्तीत भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे.

बबिता फोगटला 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळालं आहे. नायजेरियाच्या जोस सॅम्युअलबरोबर बबिताची झुंज होती. बबितानं शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर तिला पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...