मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कॉमनवेल्थ गाजवणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंचा खुराक काय असतो हे माहिती आहे का?

कॉमनवेल्थ गाजवणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंचा खुराक काय असतो हे माहिती आहे का?

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) भारतीय कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवले. जग गाजवणाऱ्या या खेळाडूंचा खुराक तसंच त्यांच्या व्यायामाचे वेळापत्रक तुम्हाला माहिती आहे का?

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) भारतीय कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवले. जग गाजवणाऱ्या या खेळाडूंचा खुराक तसंच त्यांच्या व्यायामाचे वेळापत्रक तुम्हाला माहिती आहे का?

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) भारतीय कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवले. जग गाजवणाऱ्या या खेळाडूंचा खुराक तसंच त्यांच्या व्यायामाचे वेळापत्रक तुम्हाला माहिती आहे का?

    मुंबई, 9 ऑगस्ट : कुस्ती (Wrestling) हा जगभरातील जुन्या खेळांपैकी एक आहे. रामायण-महाभारतातही कुस्तीचा उल्लेख आढळतो. सध्या कुस्ती स्टेडियममध्ये मॅटवर खेळवली जात असली तरीही ही हजारो वर्षांपासून लाल मातीत खेळली जाते. नुकत्याच संपलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) भारतीय कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवले. आठव्या दिवशी फ्री स्टाईल प्रकारात भारताच्या बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी आपापल्या वजनी गटांत गोल्ड मेडल पटकावलं. हे सर्व कुस्तीपटू मातीच्या आखाड्यातच कुस्ती शिकले आणि नंतर आधुनिक तंत्र शिकून आज जगभरात भारताचं नाव उंच करत आहेत. कसा असतो खुराक? कुस्तीपटूंना कसून सराव करण्याबरोबरच त्यांच्या खुराकाकडं विषेष लक्ष द्यावं लागतं. बजरंग पुनिया आणि रवी पुनिया यांनी हरियाणातील खेड्यातील आखाड्यातूनच आपल्या करिअरला सुरुवात केली आहे आणि आज जागतिक स्तरावर नाव कमवत आहेत. बजरंग, दीपक यांचा खुराक आणि व्यायाम याबद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत. याबाबतचं वृत्त 'आज तक'नं दिलं आहे. माध्यमांतील वृत्तानुसार बजरंग आणि दीपक यांनी हरियाणाताली झझ्झर जिल्ह्यातील बहादुरगड गावाजवळच्या छारा या छोट्याशा गावातून कुस्तीला सुरुवात केली. या गावातल्या लाला दीवानचंद आखाड्याचे ते 'बाल पैलवान' होते. बजरंगचे वडिल बलवान सिंह पूनियांनी एका इंटरव्ह्युमध्ये सांगितलं होतं की, "बजरंग 2005 पासून लाला दीवानचंद आखाड्यात जात होता. आखाडा आमच्या गावापासून 35 किलोमीटर दूर होता. तो रोज पहाटे तीन उठायचा आणि आजही त्याचं रूटिन तसंच आहे." बजरंगने 2004 मध्ये आणि रवी पुनियाने 2005 मध्ये आखाड्यात जायला सुरुवात केली होती. दीपक आखाड्यात जायला लागला तेव्हा तो खूपच लहान होता. हरियाणातील बल्लभगडचे माजी पैलवान अमित चंदीलांनी पैलवानांचा खुराक म्हणजे डाएट, व्यायाम याबद्दल एका मुलाखतीत माहिती दिली होती. ते म्हणाले, ‘कुस्तीपटूंचा आहार आणि दिनचर्या सामान्य माणसापेक्षा खूप वेगळी असते. जे दिवसभर टेबल खुर्चीवर बसून काम करतात त्यांना अशी दिनचर्या पाळणं शक्यच होणार नाही. आमची दिनचर्या लहानपणापासूनच अशी असते. आम्ही एक विशिष्ट पेय पितो ज्यामुळे ताकद येते. बदाम, पिस्ता, अक्रोड आणि काजूचे बारीक तुकडे करून त्यात काळी मिरची, पांढरी मिर्ची, पाणी, बेदाणे आणि तूप घालून एक पेस्ट केली जाते. पातळ दुधात ही सुक्या मेव्याची पेस्ट टाकतात त्यात परत तूप टाकतात. हे पेय पचायला खूप जड असतं पण ते पिल्यानंतर कुठल्याही कुस्तीपटूंचं पोट भरतं.’ CWG 2022: बर्मिंगहॅममध्ये डौलानं फडकला तिरंगा; पाहा, राष्ट्रकुलमधली भारताची कामगिरी दिवसाला किमान तूप... ‘सुक्या मेव्यात खूप उर्जा आणि फायबर असतं त्यामुळे ते खाल्लं की शरीरातील पोषकतत्त्वांची कमी भरून निघते आणि ताकद येते त्यामुळे शरीर मजबूत होतं. त्याचा व्यायाम करताना खूप फायदा होतो. व्हिटॅमिन आणि खनिजांचा स्रोत असलेल्या सुक्या मेव्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत नाही त्यामुळे ते खाणं सोपं आहे. एक कुस्तीपटू दिवसाला कमीतकमी 300 ग्रॅम तूप खातो कारण त्यामुळे त्याला ताकद मिळते. त्याचबरोबर ते दोन-तीन लिटर दूध पितात आणि सकाळ-संध्याकाळ फलाहार करतात. हे खेळाडू मुख्यत्वे सोयाबीन, पालक, ब्रोकली आणि लेट्युस या भाज्या खातात. पैलवान भरपूर भाज्या खातात पण पोळ्या मात्र प्रमाणात खातात. त्याचबरोबर एक पेहलवान आठवड्यातून तीनदा भात खातो. मीठ आणि साखरेचं प्रमाण मार्यादित असते, कारण त्यांच्या अतिसेवनाने लिव्हरचं काम बिघडू शकतं,’ असंही अमित यांनी सांगितलं. मांसाहर करतात का? कुस्तीपटू मांसाहार किती करतात याबद्दल अमित पुढे म्हणाले, ‘ शरीराला आवश्यक प्रोटिन देशी आहारातून मिळतात त्यामुळे मांसाहारावर भर दिला जात नाही. बहुतेक पेहलवान दिवसाला 200 ग्रॅम पनीर खातात. एखाद्याला वाटलं तर तो पैलवान आठवड्यात दोन-तीनदा मांसाहार करतो. आठवड्यात तीनदा खीर, गुळ आणि हलवा पैलवान खातात. कधीकधी गुळापासून तयार केलेली रबडीही खातात. कुस्तीपटू जितके कष्ट करतात तितकीच झोप त्यांना मिळणं गरजेचं असतं त्यामुळे ते दिवसा दोन तास आणि रात्री आठ तास झोप घेतात.’ CWG 2022: सिंधूचं पदक का ठरलं भारतासाठी खास? पाहा, सिंधूच्या सोनेरी यशाचं वैशिष्ट्य कुस्तीपटूच्या व्यायामाची माहिती देखील अमित यांनी दिली,‘ पहाटे सर्वजण आखाड्यात जातात आणि तिथली माती फावड्यानी खोदतात. त्यामुळे कडक झालेली माती मऊसर होते. नंतर आखाड्यातल्या उपकरणांचा वापर करून व्यायाम करून अंग गरम करतात. शरीर तापल्याने जखम होणं किंवा पाय आखडणं वगैरे गोष्टी कमी होतात. पेहलवान एकमेकांना मालिश करतात. व्यायामाला दंड-बैठकांनी सुरुवात होते. त्यानंतर दोरखंडावर चढतात. त्यामुळे शरीरातील पेशींमध्ये रक्त संचरतं. तसं नाही केलं तर कठीण व्यायाम करताना पाठीला दुखापत होऊ शकते.टायर फ्लिप, बॅटल रोप असे व्यायामही सध्या आखाड्यात केले जातात. पुश अप, स्क्वॉट, बर्पी असे व्यायामही आखाड्यात केले जातात. प्रत्येक पेलवान दररोज कमीतकमी 1000 पुशअप्स आणि 500 बर्पी करतो.’
    First published:

    Tags: Sports, Wrestler

    पुढील बातम्या