राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुपर मॉम, मेरी कॉम'नं पटकावलं सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुपर मॉम, मेरी कॉम'नं पटकावलं सुवर्णपदक

मेरी कोमने कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. 45-48 किलो वजनी गटात झालेल्या बॉक्सिंगमध्ये तिने हे पदक मिळवले आहे. मेरी कोमने कॉमनवेल्थ गेममध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आहे.

  • Share this:

14 एप्रिल : मेरी कोमने कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. 45-48 किलो वजनी गटात झालेल्या बॉक्सिंगमध्ये तिने हे पदक मिळवले आहे. मेरी कोमने कॉमनवेल्थ गेममध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आहे. तिच्या या सुवर्णकमाईमुळे भारताच्या तिजोरीत आतापर्यंत 18 सुवर्णपदकांची संख्या झाली आहे.

अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर 5-0ने मात करत मेरी कोमने सुवर्णपदक आपल्या नावे केलं. विशेष म्हणजे राष्ट्रकुलमधलं मेरी कोमचं हे पहिलं पदक आहे.

मेरी कोम व क्रिस्टिना ओहारा या दोघींनी अंतिम सामन्यात एकुण पाच फेऱ्या खेळल्या. ज्यामध्ये मेरी कोमने प्रत्येक फेरीत वर्चस्व कायम राखलं आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकुण 43 पदकं जिंकली आहेत. त्यामुळे 18 सुवर्णपदकं, 11 रौप्यपदकं व 14 कास्यपदकांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 08:45 AM IST

ताज्या बातम्या