CWG 2018 : कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पटकावलं सुवर्ण पदक

CWG 2018 : कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पटकावलं सुवर्ण पदक

कालच्याच सामन्यात तेजस्विनीने रौप्य पदक मिळवलं होतं, आणि आज तिने सुवर्ण पदकाचं शिखरं गाठलं आहे.

  • Share this:

13 एप्रिल : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदकांचा वर्षाव केला आहे. आज सकाळी मराठमोळ्या आणि कोल्हापूरची कन्या तेजस्विनी सांवतनं सुवर्ण कामगिरी केली आहे. राष्टकूल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये तिनं भारताला 16वं सुवर्णपदक पटकावून दिलं आहे.

कालच्याच सामन्यात तेजस्विनीने रौप्य पदक मिळवलं होतं, आणि आज तिने सुवर्ण पदकाचं शिखरं गाठलं आहे. या सुवर्ण पदकासह आता भारताच्या तिजोरीत एकूण 34 पदकांची कमाई झाली आहे. त्यात 16 सुवर्ण पदकं, 8 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यामुळे पदकांनी भरलेली ही तिजोरी खरंतर भारतासाठी आणि प्रत्येक भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब ठरली आहे.

 

First published: April 13, 2018, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading