Elec-widget

CWG2018 : भारताची सुवर्णसफर, नेमबाजीत मनू भाकरेनं पटकावलं सुवर्णपदक तर हिना सिध्दूला रौप्यपदक

CWG2018 : भारताची सुवर्णसफर, नेमबाजीत मनू भाकरेनं पटकावलं सुवर्णपदक तर हिना सिध्दूला रौप्यपदक

महिलांच्या 10 मी एअर पिस्टल स्पर्धेत मनू भाकर आणि हिना सिध्दूने भारताला 2 पदकं मिळवून दिली आहेत.

  • Share this:

08 एप्रिल : ऑस्ट्रेलियात होत असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारताने आज सहाव्या सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 10 मी एअर पिस्टल स्पर्धेत मनू भाकर आणि हिना सिध्दूने भारताला 2 पदकं मिळवून दिली आहेत. 16 वर्षाच्या मनू भाकरने भारतासाठी 6वं सुवर्णपदक पटकावलं आहे. तर हिना सिध्दूने 2रं रौप्यपदक पटकावलं आहे. या दोघींच्या कामगिरीमुळे क्रिडा प्रेमींचा उत्साह चांगलाच वाढला आहे.

मनूने एकूण 240.9 या गुणांनी पहिल्या क्रमांकावर राहिली. तर दुसरीकडे हिना 234 गुणांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तीसरं म्हणजेच कांस्यपदक ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियाबोविच हिनं पटकावलं आहे.

स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. नेमबाजीतील या दोन पदकांच्या जोरावर भारताची स्पर्धेतील पदकांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2018 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...