VIDEO : मँचेस्टरवरचं वादळ पाहिलंत का? धाव न घेताच केलं शतक

ICC Cricket World Cup 2019 : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने 70 चेंडूत 148 धावांची खेळी केली. या खेळीने षटकारांसह अनेक विक्रम मोडले.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 09:28 PM IST

VIDEO : मँचेस्टरवरचं वादळ पाहिलंत का? धाव न घेताच केलं शतक

मँचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्ताम यांच्यातील सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने षटकारांचा पाऊस पाडला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लडने 50 षटकांत 6 बाद 397 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमधील इंग्लंडने उभारलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. धावसंख्येपेक्षा या सामन्यात षटकारांनी विक्रम केला. हे विक्रम मोडणं अशक्य नसलं तरी कठीण आहे.

इंग्लंडने आजच्या सामन्यात एकूण 25 षटकार मारले. याआधी वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात एका संघाकडून सर्वाधिक 19 षटकार मारण्यात आले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी षटकारांचा स्वत:चा 24 षटकारांचा विक्रम मोडला. वर्ल्ड कपच्या आधी त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 24 षटकार मारले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खेळाडूने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इयॉन मॉर्गनच्या नावावर झाला आहे. त्याने 148 धावांच्या खेळीत 102 धावा फक्त षटकारांनी केल्या. षटकारांच्या मदतीने 100 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.


मॉर्गनने त्याचे अर्धशतक षटकार मारून पूर्ण केलं. त्यानंतर शतकसुद्धा षटकाराच्या सहाय्यानेच पूर्ण केलं. त्यानंतर बाद होण्याआधीच्या चेंडूवरसुद्धा त्याने षटकार मारला होता. 70 चेंडूच्या खेळीत मॉर्गनने 17 षटकार आणि 4 चौकार मारले. षटकार आणि चौकारांच्या मिळून एकूण 128 धावा झाल्या. जो रूट आणि मॉर्गनने 101 चेंडूत 189 धावांची भागिदारी केली. त्यातही दोघांनी मिळून 17 षटकार मारले.

Loading...


वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम षटकारांचा बादशहा ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने 2015 मध्ये 16 षटकार मारले होते. त्याच वर्ल्ड कपमध्ये मार्टिन गुप्टिलनेसुद्धा 11 षटकार मारले होते. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी द्विशतके केली होती.

वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट


लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...