VIDEO : IND vs PAK : विराट तु हे काय केलंस? बाद नसतानाही सोडलं मैदान!

VIDEO : IND vs PAK :  विराट तु हे काय केलंस? बाद नसतानाही सोडलं मैदान!

ICC Cricket World Cup 2019 : IND vs PAK : भारताचा कर्णधार विराट कोहलीने 77 धावांची खेळी केली पण बाद नसतानाही स्वत:हून बाहेर गेला.

  • Share this:

मँचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 336 धावा केल्या. रोहित शर्माचे झंझावाती शतक आणि केएल राहुल, विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. खरंतर रिव्ह्यूमध्ये तो झेलबाद नसल्याचं दिसत होतं. कोहलीने 65 चेंडूत 77 धावा केल्या. सामन्याच्या 48 व्या षटकात कोहली बाद झाला.

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने टाकलेला शॉर्ट बॉलवर कोहलीने फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू थेट यष्टीरक्षक सर्फराज अहमदच्या हातात गेला. तेव्हा पंचांनी बाद देण्याच्या आधीच कोहली ड्रेसिंग रूमकडे निघाला. नंतर रिव्ह्यूमध्ये तो बाद नसल्याचं दिसलं. भारताकडे डीआरएस शिल्लक होता तरीही तो न घेतल्याने विराटला बाद नसताना मैदानातून बाहेर जावं लागलं.

डीआरएसमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये अंतर असल्याचं दिसत होतं. चेंडू बॅटला लागल्याचे दिसत नव्हते. तेव्हा समालोचक आकाश चोप्राने ही विराटची चूक असल्याचं म्हटलं तर गौतम गंभीर म्हणाला की, अनेकदा शॉट मारताना बॅटच्या दांड्यातून आवाज येतो त्यामुळे कोहलीलासुद्धा समजलं नसावं.

तत्पूर्वी, भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. याखेळीत रोहित तीनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. त्यानंतर पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा रोहितने समाचार घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताच्या 2 बाद 238 धावा झाल्या होत्या त्यानंतर मोहम्मद आमीरने भारताला तीन धक्के दिले. त्याने पांड्या, कोहली आणि धोनीला बाद केले. यामुळे अखेरच्या षटकात भारताच्या धावांना ब्रेक लागला.

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live

VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 08:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading