VIDEO : INDvsPAK : भारताला दुखापतीने दिला दुसरा धक्का, भुवीने टाकलं अर्धवट षटक!

VIDEO : INDvsPAK : भारताला दुखापतीने दिला दुसरा धक्का, भुवीने टाकलं अर्धवट षटक!

ICC Cricket World Cup 2019 : IND vs PAK : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी करताना पायाचा स्नायू दुखावल्याने मैदान सोडावं लागलं. त्यानंतर विजय शंकरने उर्वरित षटक पूर्ण केलं.

  • Share this:

मुंबई, 16 जून : भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 हाद 336 धावा केल्या. त्यानंतर भारताने गोलंदाजी करताना पाचव्या षटकातील 5 व्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. हे षटक दोन गोलंदाजांनी टाकले. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला 5 वे षटक करताना पायाचे स्नायू दुखावल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. चार चेंडूत त्याने एकही धाव दिली नव्हती. त्यानंतर उर्वरित षटक टाकण्यासाठी विजय शंकरकडे चेंडू सोपवला. त्याने पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकला बाद केलं. इमामने 7 धावा केल्या. तेव्हा पाकिस्तानच्या 13 धावा झाल्या होत्या.

भुवनेश्वर कुमारने पहिले चार चेंडू निर्धाव टाकले. चौथ्या चेंडूनंतर भुवनेश्वरला वेदना होऊ लागल्या. यावेळी धोनी आणि इतरांनी त्याच्याशी चर्चा केली. दरम्यान पंचांनी हॅमर्सना मैदानात बोलवून फूटहोल्स ठीक करून घेतली. अखेर भुवनेश्वर कुमार मैदानाबाहेर गेला. त्यानंतर विजय शंकरने षटक पूर्ण केलं.


याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीने बाहेर आहे. आता वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार षटक अर्धवट ठेवून बाहेर गेल्यानं भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीबद्दल इतर कोणतीही माहिती मिळालेली नाही. शिखर धवनच्या जागी सलामीला उतरलेल्या केएल राहुललासुद्धा क्षेत्ररक्षण करताना बोटाला चेंडू लागला. मात्र त्याची दुखापत जास्त गंभीर नाही.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. याखेळीत रोहित तीनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. त्यानंतर पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा रोहितने समाचार घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताच्या 2 बाद 238 धावा झाल्या होत्या त्यानंतर मोहम्मद आमीरने भारताला तीन धक्के दिले. त्याने पांड्या, कोहली आणि धोनीला बाद केले. यामुळे अखेरच्या षटकात भारताच्या धावांना ब्रेक लागला.

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live


VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या