मुंबई, 11 ऑगस्ट : आज रक्षाबंधनाचा सण. देशभरात भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण उत्साहात साजरा होतोय. याच दरम्यान टीम इंडियाच्या आजी माजी क्रिकेटर्सनीही आपापल्या बहिणींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यात विराट कोहलीपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकरनं यानिमित्तानं ट्विट करत आपली बहिण सविता तेंडुलकरसह नितीन आणि अजित तेंडुलकर या भावांसोबतचा फोटो शेअर केला आहे. यावेळी सचिननं म्हटलंय, ‘मला माझी पहिली बॅट देण्यापासून ते नेहमी आमच्यामागे उभी राहणारी, माझी बहीण ही आयुष्यातली सर्वात मोठी भेट आहे. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा’
From gifting me my first-ever bat to always being there for us, my sister has been one of the greatest gifts of life. Sabhi ko Raksha Bandhan ki dher saari shubhkamnayein!#RakshaBandhan pic.twitter.com/nyxcjEgjlc
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 11, 2022
विराटकडून बहीण भावनाला शुभेच्छा
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बहीण भावनाला राखी सणाच्या शुभेच्या दिल्या आहेत. विराटनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर बहिणीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
विराटसह टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहरनंही बहिणीकडून राखी बांधून घेतली. रक्षाबंधनानंतर त्यानं बहिण मालतीनसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीत दीपक चहरनं बहिणीला फारच मोठी रक्षाबंधन भेट दिलेली दिसत आहे.
View this post on Instagram
भारतीय संघाचा वन डे सलामीवीर गब्बर अर्थात शिखर धवननंही रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणींसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यानं ‘माझ्या दोन लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा’ असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
रैना-युवीकडूनही शुभेच्छा
टीम इंडियाचा माजी कसोटीवीर सुरेश रैनानंही आपली मोठी बहीण रेणू रैनासोबतचा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
तर धडाकेबाज फलंदाज सिक्सर किंग युवराज सिंगनंही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulkar, Sport, Virat kohali