SRH vs CSk : चेन्नईची प्ले ऑफमध्ये एन्ट्री, हैदराबादचा 6 विकेटनं पराभव

SRH vs CSk : चेन्नईची प्ले ऑफमध्ये एन्ट्री, हैदराबादचा 6 विकेटनं पराभव

गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जनं आयपीएलच्या बाराव्या हंगामातही आपला दबदबा कायम ठेवत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

चेन्नई, 23 एप्रिल : गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जनं आयपीएलच्या बाराव्या हंगामातही आपला दबदबा कायम ठेवत प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ बनला आहे. वॉटसनच्या 96 धावांच्या खेळीवर चेन्नईनं हैद्राबादला 6 विकेटनं नमवलं.चेन्नईनं प्रथम नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण दिलं. हैदराबादनं प्रथम फलंदाजी करत 176 धावांचे आव्हान दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईनं सावध सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात त्यांना धक्का बसला. सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस (1) धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नईच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. सहाव्या षटकात रैनाने हैदराबादच्या संदीप शर्माच्या गोलंदाजीवर 22 धावा धावा चोपल्या.

दरम्यान, नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकडून वॉटसनचा झेल सुटला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू वॉटसनच्या बॅटला चाटून यष्टिमागे गेला, परंतु बेअरस्टोपासून तो लांबच होता. तरीही बेअरस्टोने तो टिपण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर रायडू आणि वॉटसन यांच्या भागीदारीमुळं हा सामना जिंकला.वॉटसननं आपल्या 96 धावांसह टी-20मधला आपला 800 धावांचा आकडा गाठला. वॉटसनच्या या खेळीमुळं चेन्नईनं हा सामना जिंकला.प्रथम फलंदाजी करताना मनिष पांडेनं चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत दमदार 83 धावा केल्या. पांडेच्या 43 चेंडूतील 83 धावांच्या जोरावर हैदराबादनं चेन्नईला 176 धावांचे आव्हान दिलं आहे.मनिष पांडेच्या खेळीच्या जोरावर हैदराबादनं चांगली कामगिरी केली. पांडेनं चेंडूत धावा केल्या. दरम्यान, हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनला आजच्या सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळं भुवनेश्वर कुमारकडं पुन्हा कर्णधारपद आलं. धोनीनं पहिला षटक राहुल चहरला दिला आणि त्यानं उत्तम गोलंदाजी करत, 4 धावा दिल्या. त्यानंतर धोनीनं चतुराईनं हरभजन सिंगच्या हातात चेंडू दिला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या डेव्हिड वॉर्नरचीही विकेट या जोडीनं काढली. वॉर्नर 45 चेंडूत 57 धावा करत बाद झाला. मनिष पांडे आणि वॉर्नर यांनी चांगली फलंदाजी केली. त्यानंतर आलेला विजय शंकर 20 चेंडूत 26 धावा करत बाद झाला.


VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 23, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या