Home /News /sport /

IPL 2021: 'त्या' 21 चेंडूत राजस्थानने CSK विरुद्धचा सामना गमावला, जडेजानेही रचला अनोखा रेकॉर्ड

IPL 2021: 'त्या' 21 चेंडूत राजस्थानने CSK विरुद्धचा सामना गमावला, जडेजानेही रचला अनोखा रेकॉर्ड

IPL 2021, CSK vs RR: सुरुवात चांगली करणाऱ्या राजस्थानच्या टीमचं त्या 21 बॉल्समध्ये संपूर्ण पारडं फिरलं आणि RR पराभवाच्या छायेत पोहोचली

    नवी दिल्ली, 20 एप्रिल: आयपीएल (IPL 2021) टी-20 क्रिकेट स्पर्धा जसजशी पुढे जात आहे तसतसा काही टीमचा खेळ सुधारतोय तर काही टीमचा घसरतोय. सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) संघावर 45 रन्सनी मात करत याही वर्षी आपण दमदार टीम असल्याचं दाखवून दिलं. या वर्षी पहिल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा पराभव केला होता पण पुढचे सलग दोन सामने जिंकत चेन्नईने आपला दम दाखवून दिला आहे. राजस्थानवरच्या विजयानंतर चेन्नई आता पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 9 बाद 188 रन्स केल्या. पण त्यांच्या एकाही फलंदाजाला 50 धावा करता आल्या नाहीत. यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने 9 बाद 143 धावा केल्या. चेन्नईने 45 धावांनी विजय नोंदवला. खरं तर राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीरांना टीमला चांगली सुरुवात करून दिली होती. राजस्थानचा स्कोअर 11 ओव्हरनंतर 2 बाद 87 रन्स होता. पण पुढच्या 21 बॉल्समध्ये संपूर्ण पारडं फिरलं आणि राजस्थानची टीम पराभवाच्या छायेत पोहोचली. या 21 बॉल्समध्ये राजस्थानने केवळ 8 रन्स केल्या आणि 5 विकेट्स गमावल्या. त्यानंतर त्यांची अवस्था 14.3 ओव्हरमध्ये 7 बाद 95 अशी झाली. त्यामुळे या 21 बॉल्समुळेच राजस्थानने हा सामना गमावला. (हे वाचा-IPL 2021 : एमएस धोनीने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा जगातला पहिलाच) जडेजाच्या दोन तर मोईनच्या तीन विकेट्स डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाने 12 व्या ओव्हरमध्ये जॉस बटलर आणि शिवम दुबे या दोघांना बाद केलं. बटलरने 49 धावा केल्या तो मैदानात होता तोपर्यंत राजस्थानच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. त्यानंतर मोईनने 13 ओव्हरमध्ये एक आणि 15 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेऊन राजस्थानला रोखलं. राजस्थानच्या 6 बॅट्समनना 10 रन्सचा आकडाही गाठता आला नाही. बॅटिंग करताना मोईनने 20 बॉल्समध्ये 26 रन्स केल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (हे वाचा-IPL 2021 : 3 सामन्यांमध्ये मुंबईचं एकच अर्धशतक, दिल्लीविरुद्ध कामगिरी सुधारणार?) अष्टपैलू जडेजाचं योगदान ऑलराउंडर रवींद्र जडेजाने आपल्या सर्व कौशल्यांचा पुरेपूर वापर करत टीमच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्यानी बॅटिंग करताना 8 रन केल्या. बॉलिंगमध्ये 28 रन देत 2 विकेट्स घेतल्या आणि फील्डिंग करताना 4 कॅच पकडले. अशा पद्धतीने त्याने 6 विकेट्ससाठी योगदान दिलं. चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याची ही आयपीएलमधली 200 मॅच होती त्यामुळे काही विशेष करण्याचा प्रयत्न टीममधल्या प्रत्येकाने केला. जडेजानेही आपल्या कामगिरीने त्याचा मित्र माहीला सलाम केला. राजस्थानची टीम ही मॅच  45 रन्सनी हरली. तीन सामन्यांपैकी त्यांचा हा दुसरा पराभव आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Cricket news, Csk, IPL 2021, Rajasthan Royals, Sports

    पुढील बातम्या