VIDEO : ...आणि अश्विन झाला वेगवान गोलंदाज, 'या' शैलीने सगळेच हैराण

VIDEO : ...आणि अश्विन झाला वेगवान गोलंदाज, 'या' शैलीने सगळेच हैराण

रविचंद्रन अश्विनने 4 षटकांत 23 धावा देत 3 गडी बाद केले.

  • Share this:

चेन्नई, 06 एप्रिल : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डुप्लेसीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 3 बाद 160 धावा केल्या आणि पंजाबसमोर 161 धावांचे आव्हान ठेवले. डुप्लेसीने 38 चेंडूत 54 धावा केल्या. वॉटसनने 26 धावा केल्या. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने 23 धावा देत 3 गडी बाद केले. रायडुने 15 चेंडूत 21 धावा केल्या तर धोनीने 23 चेंडूत 37 धावा केल्या.

सामन्यातील आठव्या षटकात रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीच्या शैलीत थोडासा बदल केल्याने सगळेच हैराण झाले. फिरकीपटू असलेल्या अश्विनने केदार जाधवप्रमाणे धावत येऊन वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने सलग दोन चेंडू असले टाकले. यातील पहिल्या चेंडूवर डुप्लेसीने एक धाव काढली तर रैनाला टाकलेला चेंडू वाईड होता.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अश्विन वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. अश्विनने तीन विकेट घेतल्या.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभवानंतर महेंद्र सिंग धोनीने संघात तीन बदल केले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने संघात तीन बदल केले असून शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा यांना विश्रांती दिली आहे तर दुखापतीमुळे ब्राव्हो खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी फाफ डुप्लेसी, हरभजन सिंग आणि स्कॉट कुग्गलेन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'

First published: April 6, 2019, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading