मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CSK vs GT सामन्यावेळी जिओ सिनेमाचा वर्ल्ड रेकॉर्ड, अडीच कोटी प्रेक्षक होते लाइव्ह

CSK vs GT सामन्यावेळी जिओ सिनेमाचा वर्ल्ड रेकॉर्ड, अडीच कोटी प्रेक्षक होते लाइव्ह

जिओ सिनेमाने रचला इतिहास

जिओ सिनेमाने रचला इतिहास

मॅचच्या दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जिओ सिनेमावर एकाचवेळी सर्वाधिक 2.5 कोटी काँकरंट व्ह्युअर्स होते. खरं तर इतक्या मोठ्या व्ह्युअर्सचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

  मुंबई, 24 मे : एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मंगळवारी रात्री चेपॉक इथं क्वालिफायर 1 मध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (GT) 15 धावांनी पराभव केला. या विजयाने एमएस धोनीची टीम इंडियन प्रीमिअर टी-20 क्रिकेट लीग 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली. 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल खेळली जाणार आहे.

  दरम्यान, चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर जीटी विरुद्ध सीएसके मॅचने मंगळवारी रात्री JioCinema वर सर्वाधिक काँकरंट व्ह्युअर्स मिळवले. मॅचच्या दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जिओ सिनेमावर एकाचवेळी सर्वाधिक 2.5 कोटी काँकरंट व्ह्युअर्स होते. खरं तर इतक्या मोठ्या व्ह्युअर्सचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कारण या पूर्वी 17 एप्रिल 2023 रोजी CSK विरुद्ध RCB सामन्यादरम्यान रिजस्टर्ड 2.4 कोटी काँकरंट व्ह्युअर्स होते. अवघ्या एका महिन्यात हा रेकॉर्ड मोडला गेला आहे.

  VIDEO : धोनीच्या जाळ्यात अलगद फसला हार्दिक पांड्या, एक फिल्डर बदलला अन्... 

  चाहत्यांनी या स्ट्रीमिंगचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यापैकी काही युजर्सच्या प्रतिक्रिया पाहूयात. एका युजरने म्हटलंय, 'धोनीचा रेकॉर्ड कोणी मोडू शकत असेल, तर तो फक्त धोनी आहे. जिओ सिनेमावर 2.5 कोटी काँकरंट व्ह्युअर्सचा नवीन रेकॉर्ड.' तर आणखी एका युजरने 'जवळपास 2.5 कोटी प्रेक्षक JioCinema वर हा IPL क्वालिफायर पाहत आहेत. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला तेव्हा असंच दृश्य पाहायला मिळालं होतं. हे ग्लोबल काँकरंट लाइव्ह स्ट्रीमिंगचे ऐतिहासिक आकडे आहेत. मला खात्री आहे की 28 तारखेला इतिहास घडेल!' असं म्हटलं आहे.

  जिओ सिनेमा सर्व प्रेक्षकांसाठी IPL सामने फ्री स्ट्रीम करत आहे. इंगेजमेंटचा जिओ सिनेमा दररोज नवनवीन बेंचमार्क सेट करत आहे. प्लॅटफॉर्मवरील एकूण व्हिडिओ व्ह्युजने आधीच 1300 कोटी व्हिडिओ व्ह्युज ओलांडले आहेत आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.

  स्ट्रीमिंग अॅप जिओ सिनेमा आयपीएलद्वारे दररोज लाखो नवीन व्ह्युअर्स जोडत आहे. प्रति मॅच प्रति व्ह्युअर्स अॅव्हरेज स्ट्रीमिंग टाइम आधीच 60 मिनिटांपेक्षा जास्त झूम झाला आहे. भारतातील सर्व प्रेक्षकांसाठी जिओ सिनेमाच्या टाटा आयपीएल 2023 च्या फ्री स्ट्रीमिंगमुळे व्ह्युजची संख्या विक्रमी वाढली आहे.

  स्पॉन्सरशिप आणि अॅडव्हर्टाईजमेंटच्या बाबतीत जिओ सिनेमाने 26 मार्की स्पॉन्सर्समध्ये सहभाग घेतला आहे, हे कोणत्याही खेळासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

  First published:
  top videos

   Tags: IPL 2023