मांजरेकरांची सुट्टी होताच CSK ने वाजवली 'शिट्टी', जडेजावर केलेल्या कमेंटचा 'असा' घेतला बदला

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना बीसीसीआयच्या कमेंट्री टीममधून हटवण्यात आलं आहे. त्यानंतर सीएसकेने एक कमेंट केली असून मांजरेकरांनी जडेजावर केलेल्या कमेंटचा बदला असल्याचं म्हटलं जात आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना बीसीसीआयच्या कमेंट्री टीममधून हटवण्यात आलं आहे. त्यानंतर सीएसकेने एक कमेंट केली असून मांजरेकरांनी जडेजावर केलेल्या कमेंटचा बदला असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 मार्च : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी बीसीसीआय़ने समालोचकांच्या टीममधून हटवलं आहे. मांजरेकरांना का हटवण्यात आलं याबद्दल अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपमध्ये मांजरेकरांनी जडेजावर केलेल्या कमेंटनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. आता माजरेकरांनी कमेंट्री टीममधून काढण्यात आल्यानंतर आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जने मांजरेकरांना ट्रोल केलं आहे. मांजरेकरांना हटवल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने म्हटलं की, 'आता बाइट अॅड पिसेसमध्ये आवाज ऐकण्याची गरज नाही.' मांजरेकरांनी जडेजावर केलेल्या कमेंटवर हे उत्तर आहे असंच म्हणता येईल. कारण मांजरेकरांनीसुद्धा अशाच शब्दांचा वापर करत जडेजावर कमेंट केली होती. जडेजाचा केला होता अपमान कोलकाता येथे भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या डे-नाईट मालिकेदरम्यान मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती. मांजरेकर यांनी,"रवींद्र जडेजा हा एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नाही. असे कधी तरी खेळणारे खेळाडू मला आवडत नाहीत. त्याचबरोबर, तो कसोटी सामन्यात पूर्ण गोलंदाज आहे. 50 षटकांच्या क्रिकेटसाठी मी प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाज किंवा कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा समावेश करू इच्छितो, पण जडेजाचा नाही", अशा शब्दात टीका केली होती. या वक्तव्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी मांजरेकरांना चांगलेच फैलावर घेतले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तम समालोचक म्हणून ओळख असलेले संजय मांजरेकर यांची बीसीसीआयने हकालपट्टी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र या सामन्यात संजय मांजरेकर समालोचक म्हणून उपस्थित होते. मात्र मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, संजय मांजरेकर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हे वाचा  : IPL बाबत सौरव गांगुलीने केली मोठी घोषणा, कोरोनोच्या दहशतीचा असा होणार परिणाम मांजरेकर यांनी आतापर्यंत 3 वर्ल्ड कपचे समालोचन केले आहे. 1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत. मात्र बीसीसीआयने त्यांचा आयपीएलच्या पॅनलमध्येही समावेश केलेला नाही आहे. यामागे त्यांनी समालोचन करताना केलेला खेळाडूंचा अपमान हे कारण असू शकते. संजय मांजरेकर यांनी याआधी रविंद्र जडेजा हा चांगला खेळाडू नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावरून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगले फैलावर घेतले होते. तसेच, त्यांनी समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले यांचाही अपमान केला होता. हे वाचा : क्रिकेटच्या मैदानात सुरू झाला ‘लगोरी’चा डाव, असा Run Out कधीच पाहिला नसेल
    First published: