Home /News /sport /

धोनीच्या बॉलरने आफ्रिकेची 'वाट' लावली, T20 World Cup मध्येही करणार धमाका!

धोनीच्या बॉलरने आफ्रिकेची 'वाट' लावली, T20 World Cup मध्येही करणार धमाका!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये श्रीलंकेकडून (Sri Lanka vs South Africa) पदार्पण करणाऱ्या महीष तीक्ष्णाने (Maheesh Theekshana) धमाकेदार सुरुवात केली आहे.

    कोलंबो, 8 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये श्रीलंकेकडून (Sri Lanka vs South Africa) पदार्पण करणाऱ्या महीष तीक्ष्णाने (Maheesh Theekshana) धमाकेदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने 10 ओव्हरमध्ये 37 रन देऊन 4 विकेट घेतल्या. या मॅचमध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 78 रनने पराभव केला आणि सीरिजही 2-1 ने जिंकली. महीष तीक्ष्णाने आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्याने जानेमन मलान, हेनरिच क्लासेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज आणि कागिसो रबाडाला आऊट केलं. महीष तीक्ष्णा आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) राखीव खेळाडू आहे. यावर्षाच्या सुरुवातीला महीष तीक्ष्णा आणि मथिषा पथिराणा यांना आयपीएलमध्ये चेन्नईमध्ये बोलावण्यात आलं होतं. श्रीलंकेच्या या दोन बॉलरना सीएसकेने चेन्नईला बोलावलं. या दोघांनी चेन्नईच्या बॅट्समनना नेटमध्ये सराव दिला. महीष तीक्ष्णा ऑफ स्पिनर आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. तर लंका प्रीमियर लीगमध्ये तो जाफना स्टालियन्सकडून खेळला. मुथय्या मुरलीधरन आणि अजंता मेंडिस या दोघांनी त्यांच्या मिस्ट्री स्पिनने जगभरातल्या दिग्गज बॅट्समनना त्रास दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये श्रीलंकेने अशाच प्रकारच्या मिस्ट्री स्पिनरला संधी दिली. या सामन्यात 21 वर्षांच्या महीष तीक्ष्णाने आपल्या बॉलिंगमधली विविधता दाखवली. तीक्ष्णाने आपल्या ऑफब्रेक आणि कॅरम बॉलने आफ्रिकन बॅट्समनना त्रास दिला. तीक्ष्णाला टी-20 सीरिजसाठी टीममध्ये निवडलं होतं, पण खेळपट्टी बघून आम्ही त्याला संधी दिली, असं श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका म्हणाला. नुकत्याच झालेल्या टी-20 स्पर्धेत तीक्ष्णाने 6.42 च्या इकोनॉमी रेटने 4 विकेट घेतल्या. तीक्ष्णाने फक्त 11 लिस्ट ए सामन्यात 16.15 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, MS Dhoni, Sri lanka, T20 world cup

    पुढील बातम्या