• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • धोनीला 'त्रास' देणारा खेळाडू टीम इंडियासोबत श्रीलंकेला जाणार!

धोनीला 'त्रास' देणारा खेळाडू टीम इंडियासोबत श्रीलंकेला जाणार!

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा बीसीसीआयने गुरुवारी केली. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) नवोदितांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये स्पिनर रवी श्रीनिवास साई किशोर (Sai Kishore) याचाही समावेश आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 जून : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा बीसीसीआयने गुरुवारी केली. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) नवोदितांना संधी देण्यात आली आहे. शिखर धवन या टीमचं नेतृत्व करेल. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियासोबत काही नेट बॉलरही जाणार आहेत, यामध्ये स्पिनर रवी श्रीनिवास साई किशोर (Sai Kishore) यालाही संधी देण्यात आली आहे. तामीळनाडूला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) जिंकवून देण्यात साई किशोरने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्याला आयपीएलमध्ये (IPL) एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातल्या चेन्नई सुपरकिंग्सचीही (CSK) साथ मिळाली. चेन्नईच्या टीममध्येही साई किशोरला खूप काही शिकायला मिळालं. आयपीएल कोरोनामुळे स्थगित व्हायच्या एक महिना आधी साई किशोरने चेन्नई सुपरकिंग्ससोबत सराव शिबिरात क्रिकेटबद्दल वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आता टीम इंडियासोबत नेट बॉलर म्हणून निवड झाल्यानंतर साई किशोर म्हणाला, 'चेन्नईसोबत असणं खूप सकारात्मक गोष्ट आहे, त्यामुळे माझा खेळ सुधारला. जेव्हा तुम्ही सर्वोत्तम खेळाडूंसोबत सराव करता तेव्हा स्वत:मध्येही सुधारणा होते.' 'चेन्नईसोबत सराव करणं आणि त्यांच्यासोबत असणं शानदार होतं. मी स्वत:मध्ये खूप सुधारणा केली. आसपासचं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं असतं, टीमने पूर्ण लक्ष ठेवलं आणि आम्हाला प्रेरित केलं,' असं 24 वर्षांच्या साई किशोरने सांगितलं. त्याने आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 48 विकेट घेतल्या आहेत. साई किशोरने आपल्या बॉलिंगने आयपीएलदरम्यान सराव करताना धोनीला चांगलाच त्रास दिला होता. भारत-श्रीलंका यांच्यात पहिली वनडे 13 जुलै, दुसरी वनडे 16 जुलै आणि तिसरी वनडे 18 जुलैला होईल. तर टी-20 सीरिज 21 जुलैपासून सुरू होईल. दुसरी टी-20 23 जुलैला आणि तिसरी टी-20 25 जुलैला होईल. हे सगळे सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होतील. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय टीम हे सगळे सामने खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह
  Published by:Shreyas
  First published: