स्पोर्ट्स

  • associate partner

धोनीसोबत झालेल्या वादामुळे सुरैश रैना IPL सोडून भारतात परतला? वाचा नेमकं काय घडलं

धोनीसोबत झालेल्या वादामुळे सुरैश रैना IPL सोडून भारतात परतला? वाचा नेमकं काय घडलं

चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांनी सुरेश रैनाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळणाऱ्या सुरेश रैनानं (Suresh Raina) भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर CSK ला मोठा झटका बसला. असे सांगितले जात आहे की, कौटुंबिक कारणामुळे रैनानं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, रैनाला मुलगी ग्रेसीया, मुलगा रियो आणि पत्नी प्रियंका यांच्या आरोग्याची काळजी होती, त्यामुळे तो भारतात परतला. मात्र चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांनी सुरेश रैनाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. एन श्रीनिवासन यांनी आरोप केला आहे की, कौटुंबिक कारणामुळे नाही तर आपल्या मनाप्रमाणे हॉटेल रूम न मिळाल्यामुळे रैनानं आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला.

चेन्नई सुपरकिंग्जचे मालक श्रीनिवासन यांनी आउटलूकशी केलेल्या खास मुलाखतीत असे सांगितले की, मनाप्रमाणे हॉटेल रूम न मिळाल्यामुळे रैनानं आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला. दुबईतील सुरेश रैनाच्या हॉटेल रूममध्ये बाल्कनी नव्हती. धोनीच्या खोलीत बाल्कनी होती. सुरेश रैनाला त्याच्या परिवारासाठी धोनीसारखी रूम हवी होती, पण जेव्हा तसे झाले नाही तेव्हा त्याने रागाने टीम सोडली आणि दुबईहून दिल्लीला परतला. आउटलुकच्या वृत्तानुसार सुरेश रैना आणि धोनी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर संघाचे मालक श्रीनिवासन यांनीही कर्णधाराशी या विषयावर चर्चा केली.

वाचा-'कुटुंबासोबत असताना मास्क वापरत नाही', कोरोना पॉझिटिव्ह CSK खेळाडूचे चॅट VIRAL

संघाचे अधिकृत विधान नाही

सुरेश रैनाबाबत संघाचे कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही मात्र रिपोर्टनुसार दुबईला पोचल्यापासून रैना हॉटेलच्या खोलीवर निराश झाला होता. रैनाला एक मोठी बाल्कनी असलेली रूम हवी होती. महेंद्रसिंग धोनीने सुरेश रैनाशी बोलण्याचाही प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

वाचा-सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

'CSK म्हणजे एक कुटुंब'

श्रीनिवासन यांनी आउटलुकशी खास बातचीत करताना सांगितले की, 'चेन्नई सुपरकिंग्ज नेहमीच कुटुंबासारखी राहिली आहे. माझा विचार असे आहेक की, जर तुम्ही आनंदी नाही आहात तर परत जा. कोणालाही काही बोलण्याची गरज नाही. कधीकधी यश तुमच्या डोक्यात जाते. डोक्यावर येते.

वाचा-मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, IPL सोडून सुरेश रैना भारतात परतला

श्रीनिवासन यांनी धोनीशी केली चर्चा

श्रीनिवासन यांनी आउटलुकला सांगितले की, 'मी धोनीशी बोललो आणि त्याने मला चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. धोनीने व्हिडीओ कॉलवर संघातील खेळाडूंशी संवाद साधला. माझ्याकडे चांगला कर्णधार आहे. यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास मिळतो'. दुसरीकडे चेन्नई संघातील दोन खेळाडूंना कोरोना झाल्याचे वृत्तही समोर आले होते. त्यामुळे सध्या चेन्नईचा संपूर्ण संघ क्वारंटाइन करण्यात आला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 31, 2020, 8:44 AM IST

ताज्या बातम्या