IPL 2019 : टीम धोनीच्या चाहत्यांचा कौतुकास्पद उपक्रम, अशी जिंकली सर्वांची मनं

IPL 2019 : टीम धोनीच्या चाहत्यांचा कौतुकास्पद उपक्रम, अशी जिंकली सर्वांची मनं

चेन्नई आपला पुढचा सामना मंगळवारी कोलकाता विरोधात आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत.

  • Share this:

चेन्नई, 08 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्ज संघानं पाच पैकी चार सामने जिंकत आपला विजयरथ कायम राखला आहे. धोनीची सेना हळुहळु आपलं चौथं विजेतपद जिंकण्यासाठी आगेकुच करत आहेत. मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर एकमेव पराभव चेन्नईला स्वीकारावा लागला. मात्र, पंजाबला मात देत धोनीच्या संघानं आपल्या घरच्या पुन्हा कमबॅक केला. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई यांचे फॅन्स सगळ्यात जास्त उत्साही मानले जातात. पण ‘यलो फिवर’ पुढं सगळ्यांनी हात जोडले.

चिन्नास्वामीवर झालेल्या मॅच दरम्यान धोनीच्या संघाला चिअर करणारी whistlepodu आर्मी केवळ आपल्या संघाला सपोर्टकरुन थांबली नाही. तर, त्यांनी सामना संपल्यानंतर स्टेडियमची स्वत: साफसफाई केली. स्टेडियमवरचा कचरा उचलत, स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांना मदत केली. याबद्दल चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना यानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत, या आपल्या फॅन्सची तारीफ केली.

सुरेश रैनानं फोटो शेअर करत, मला आनंद आहे की आमचे फॅन्स अशी चांगली कामगिरी करत आहेत. चेन्नईचा सामना संपल्यानंतर चेन्नईच्या फॅन्सनी तब्बल 10 किलो कचरा जमा केला. चेन्नई आपला पुढचा सामना मंगळवारी कोलकाता विरोधात आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत.

बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोर

First published: April 8, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading