कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर हसीला मिळाला मोठा दिलासा, रविवारी मायदेशी जाण्याची संधी

कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर हसीला मिळाला मोठा दिलासा, रविवारी मायदेशी जाण्याची संधी

चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकल हसीला (mike hussey) अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : गेल्या काही दिवसांपासून चेन्नईमध्ये अडकून पडलेला आयपीएल (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकल हसीला (MIKE HUSSEY) अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. हसीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याला मालदीवमध्ये विलगीकरणात राहावं लागत होतं. पण आता निगेटिव्ह चाचणी आल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियात परतता येणार आहे.

हसी आणि गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी या दोघांचीही कोरोना चाचणी आता निगेटिव्ह आली आहे. या दोघांनाही आयपीएल बंद झाल्यापासून दहा दिवसांपासून चेन्नईमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. या अगोदरची हसीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळं सध्या एल. बालाजी त्याच्या चेन्नईतील घरी परतला आहे, तर येत्या रविवारी हसीदेखील ऑस्ट्रेलियाला परतणार आहे.

हसीला सध्या इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे मालदीवमध्ये विलगीकरणात राहण्याची गरज नाही. मालदीवमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. आता 16 मेपासून भारतातून ऑस्ट्रेलियाला विमान उड्डाणे सुरू होणार आहेत. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आणि लगेच रविवारपासून ऑस्ट्रेलियासाठी विमान उड्डाणे सुरू होणार असल्याने हसीसाठी दिलासादायक घडामोडी घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आता त्याला थेट त्याच्या घरी ऑस्ट्रेलियाला पोहोचता येणार आहे. इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पॉझिटिव्ह नसतानाही विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळं विनाकारण त्रास सहन करावा लागला आणि कुटुंबाला सोडून मालदीवमध्ये राहण्याची वेळ आली.

हे वाचा - 17 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न; मधुचंद्रासाठी गेलेल्या तरुणाचा कोरोनामुळे अंत

चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी शुक्रवारी सांगितलं की, मायकल हसी आरटी-पीसीआर टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत. कोरोना आजारातून चांगल्या पद्धतीनं बरे झाले आहेत. आम्ही अजून त्यांना कोणत्या मार्गे त्यांच्या मायदेशी पाठवायचे हे निश्चित केलेले नाही. हसी भारतातूनच थेट ऑस्ट्रेलियाला जाईल की, अगोदर मालदीवला जाऊन इतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत तेथून उड्डाण घेतील, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं त्यांनी सांगितले. सध्या मालदीवमध्ये विलगीकरणात असलेले ऑस्ट्रेलियाचे इतर सर्व खेळाडू रविवारी ऑस्ट्रेलियासाठी विमानाद्वारे पोहोचणार आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 14, 2021, 10:05 PM IST

ताज्या बातम्या