IPL 2019 : धोनीची जादू चालली, राजस्थानवर 8 धावांनी विजय

IPL 2019 : धोनीची जादू चालली, राजस्थानवर 8 धावांनी विजय

आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग तीन सामने जिंकत आपली विजय घौडदौड चेन्नईनं कायम राखली.

  • Share this:

चेन्नई, 31 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग तीन सामने जिंकत आपली विजय घौडदौड चेन्नईनं कायम राखली आहे. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा 8 धावांनी पराभव केला. यात सर्व श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जातं. चेपॉकवर राजस्थान विरोधात हल्लाबोल करत धोनीनं चेन्नईला सावरले. आतापर्यंत राजस्थानला एकही सामना जिंकता न आल्यामुळे ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. मात्र चेन्नईने आयपीएलच्या १२ व्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखत, घरच्या मैदानावर खेळत अटीतटीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला.अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना ब्राव्होने राजस्थानच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत चेन्नईला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नई एकही सामना हरलेली नाही.

१७६ धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून राजस्थानची सुरुवात खराब झाली. एकही धाव न घेता राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद झाला. त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथ या मधल्या फळीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर आर्चर-स्टोक्स या जोडीने राजस्थानचा हा विजय जवळपास निश्चित केला होता. मात्र अखेरच्या षटकात स्टोक्स बाद झाल्याने राजस्थानच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. मोक्याच्याक्षणी ब्राव्होने आपल्या अनुभव पणाला लावत संघाला विजय मिळवून दिला.

महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद खेळीमुळे चेन्नईने राजस्थानसमोर १७६ धावांचं आव्हान ठेवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं सलग तीन षटकार मारत १५३ च्या स्ट्राईक रेटनं ७५ धावा केल्या.चेन्नईची चांगली सुरुवात झालेली नसतानाही, धोनीने सुरेश रैना आणि ब्राव्होच्या मदतीने संघासाठी १५० च्या पार धावसंख्या नेली.

चेन्नईच्या सलामीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी फलंदाजीची मदार कर्णधार धोनीवर आली होती. यावेळी धोनीनं आपले आयपीएलमधले 21वे अर्धशतक ठोकले. ब्राव्होनं यावेळी धोनीला चांगली साथ दिली. राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत, अंबाती रायडूला एका धावावरच बाद केले. तर, वॉटसन आणि केदार जाधवही लवकर बाद झाले. त्यानंतर धोनी आणि रैना यांनी संघाला सारवले. त्यामुळे ९ षटकांत चेन्नईला ४५ धावा करता आल्या. त्यानंतर सुरेश रैना चांगली फलंदाजी करत 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्राव्हो 27 धावा करत बाद झाला.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या