मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवं वादळ, स्मिथ-एबी-बाऊचरवर गंभीर आरोप, चौकशी होणार

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवं वादळ, स्मिथ-एबी-बाऊचरवर गंभीर आरोप, चौकशी होणार

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये (CSA) नवं वादळ येऊन ठेपलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू ग्रॅम स्मिथ, एबी डिव्लिहियर्स आणि मार्क बाऊचर यांच्यावर वर्णद्वेषाचे आरोप झाले आहेत.

  • Published by:  Shreyas

जोहान्सबर्ग, 20 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये (CSA) नवं वादळ येऊन ठेपलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू ग्रॅम स्मिथ, एबी डिव्लिहियर्स आणि मार्क बाऊचर यांच्यावर वर्णद्वेषाचे आरोप झाले आहेत. सोशल जस्टीस आणि नॅशनल बिल्डिंग (SJN) आयोगाच्या रिपोर्टची समीक्षा करून सध्याचे डायरेक्टर ग्रॅम स्मिथ आणि टीमचा मुख्य कोच मार्क बाऊचर यांच्या आचरणाची चौकशी केली जाईल, असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने घोषित केलं आहे. एसजेएन आयोगाचे प्रमुख दुमिसा नटसेबेजा यांच्या 235 पानी रिपोर्टमध्ये माजी कर्णधार आणि सध्याचा डायरेक्टर ग्रॅम स्मिथ आणि बाऊचर यांच्याशिवाय एबी डिव्लिहियर्स याच्यावरही वर्णभेदी वर्तणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रीय टीममध्ये कृष्णवर्णीय खेळाडूंची निवड न करता त्यांनी भेदभाव केला, असा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 'औपचारिक चौकशी नव्या वर्षाच्या सुरुवातीला होईल. असं असलं तरी स्मिथ आणि बाऊचर आपल्या पदावर राहतील. भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये ते आपली सेवा देतील,' असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने सांगितलं. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार स्वतंत्र कायदेतज्ज्ञ या प्रकरणाचा तपास करणार आहे.

या रिपोर्टवर विचार करण्यासाठी शनिवारी बैठक झाली, पण बोर्ड एबी डिव्लिहियर्सच्या चौकशीबाबत गप्प आहे. वर्णद्वेष आणि वर्णभेदाच्या आरोपांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. आम्ही श्रम कायदा तसंच संविधानासंदर्भात निष्पक्षता आणि योग्य प्रक्रिया सुरू करण्यासाठी आमचं कर्तव्य पार पाडू, असं बोर्डाने सांगितलं आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. यानंतर 3 वनडे मॅचची वनडे सीरिजही होणार आहे.

First published: