मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Rohit Sharma: रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी, मुंबईतील एका हॉटेलबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma: रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी, मुंबईतील एका हॉटेलबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

रोहित शर्माला पाहण्यासाठी झालेली गर्दी

रोहित शर्माला पाहण्यासाठी झालेली गर्दी

Rohit Sharma: 15 ऑगस्टला रोहित मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पोहोचला. पण रोहित त्या हॉटेलमध्ये आहे हे कळताच त्याला पाहण्यासाठी हजारो चाहते त्या हॉटेलबाहेर जमले. आणि त्यांनी एकच गर्दी केली. हळूहळू ही गर्दी इतकी वाढली की रोहितला हॉटेलबाहेर येताच पुन्हा आत जावं लागलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 16 ऑगस्ट: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. चाहत्यांच्या मनात रोहितसाठी खास जागा आहे. आणि काल मुंबईत याचा प्रत्यय आला. 15 ऑगस्टला रोहित मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पोहोचला. पण रोहित त्या हॉटेलमध्ये आहे हे कळताच त्याला पाहण्यासाठी हजारो चाहते त्या हॉटेलबाहेर जमले. आणि त्यांनी एकच गर्दी केली. हळूहळू ही गर्दी इतकी वाढली की रोहितला हॉटेलबाहेर येताच पुन्हा आत जावं लागलं. खरं तर इतकी गर्दी झालेली पाहून रोहितलाही आश्चर्य वाटलं. तो बाहेर पडण्यासाठी हॉटेलच्या दरवाजावर आला. त्यानं चाहत्यांना हातही दाखवला. पण गर्दी वाढल्यानं सुरक्षा रक्षकांनी रोहितला पुन्हा हॉटेलमध्ये परतण्याची विनंती केली. रोहितकडेही दुसरा पर्याय नव्हता. कारण चाहत्यांच्या गर्दीमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. ही घटना सोमवारची आहे. सध्या सोशल मीडियात या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. आशिया चषकासाठी सज्ज दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया लवकरच दुबईला प्रयाण करणार आहे. 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत (UAE) आशिया चषक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत 28 ऑगस्टला भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. गतविजेती टीम इंडिया यंदाही या स्पर्धेत विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. रोहितच्या नेतृत्वात 2018 सालीही भारतानं आशिया चषक जिंकला होता. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
First published:

Tags: Mumbai, Rohit sharma, Team india

पुढील बातम्या