'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग

'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग

क्रोएशिया देशाच्या संघर्षाच्या गोष्टीने अनेकजण प्रभावीत झाले आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जुलैः भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने फिफा वर्ल्ड कपच्या बहाण्याने भारतीय राजकारणावर निशाणा साधला आहे. हरभजनने ट्विट करत म्हटले की, क्रोएशियासारखा देश फुटबॉल वर्ल्ड कप खेळतोय आणि आपण 135 कोटींचा लोकसंख्या असलेला देश हिंदू- मुस्लिम खेळतोय. काल फ्रान्स- क्रोएशिया देशांमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात क्रोएशियाला फ्रान्सकडून 4-2 अशी हार पत्करावी लागली होती. पण तरीही क्रोएशिया देशाच्या संघर्षाच्या गोष्टीने अनेकजण प्रभावीत झाले आहेत.

याचपार्श्वभूमीवर हरभजनने अंतिम सामन्याच्याआधी ट्विट केले होते. साधारणपणे 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया हा छोटासा देश आज फुटबॉल वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळत आहे आणि 135 कोटी लोकसंख्या असलेले आपण भारतीय हिंदू- मुस्लिम खेळत आहोत. विचार बदला. देश बदलेल.

पंतप्रधान मोदींनी फ्रान्ससोबत क्रोएशियाचेही केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत क्रोएशियालाही शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विट करत म्हटले की, एक सुंदर सामना. फ्रान्सला फिफा वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल शुभेच्छा. त्यांनी प्रत्येक सामना फार चांगला खेळला. खासकरून अंतिम सामन्यात त्यांचा खेळ उत्कृष्ट होता. मी यावेळी क्रोएशिया टीमचेही अभिनंदन करु इच्छितो. त्यांनी वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक प्रदर्शन केले आहे.

20 वर्षांनंतर फ्रान्सने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला. रुसमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियावर 4- 2 असा विजय मिळवला. 1998 नंतर दुसऱ्यांदा फ्रान्स विश्वविजेता झाला आणि क्रोएशिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून एक पाऊल मागे राहिला.

हेही वाचाः

तिकीट विंडोवरून खरेदी केलेलं ट्रेनचं तिकीट मोबाईलवरून कसं कराल रद्द?

रेशम टिपनीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

मुंबईत मुसळधार पाऊस, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा

First Published: Jul 16, 2018 09:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading