FIFA World Cup 2018 : रोनाल्डोचा एक गोल, मोरोक्को बाहेर !

FIFA World Cup 2018 : रोनाल्डोचा एक गोल, मोरोक्को बाहेर !

ख्रिस्तियानो रोनाल्डोने हेडरवर केलेल्या एका गोलमुळे फीफा वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालला पहिला विजय मिळवून दिलाय.

  • Share this:

रशिया, 20 जून :  ख्रिस्तियानो रोनाल्डोने हेडरवर केलेल्या एका गोलमुळे फीफा वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालला पहिला विजय मिळवून दिलाय. पोर्तुगालने मोरोक्कोवर 1-0 ने पराभूत करत विजयाचं खात उघडलंय.

लुज्निकी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात रोनाल्डोने चौथ्या मिनिटात काॅर्नर मिळाला हीच संधी साधत कर्णधार रोनाल्डोने गोल साधला. या विजयामुळे मोरोक्को टीम नाॅकआऊटमधून जवळपास बाहेर गेलीये. या टीमला आता ग्रुप बी मध्ये पहिल्या सामन्यात इराणने पराभूत केलं होतं.

रोनाल्डो हा सर्वाधिक गोल करणारा युरोपियन खेळाडू आहे. त्याने आंतराष्ट्रीय स्तरावर 85 गोल केले आहे. एवढंच नाहीतर पोर्तुगालकडून सर्वाधिक गोल करणार तो दुसरा खेळाडू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 10:35 PM IST

ताज्या बातम्या