तीन मिनीटांचा या व्हिडीओत जॉर्जिना दिसत असून 'Happy Birthday Geo' या मेसेजने हा व्हिडीओ संपतो. जॉर्जिना रॉड्रिगेजने देखील या क्षणांचे व्हिडीओ, काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने खास कॅप्शनदेखील लिहिली आहे.View this post on Instagram
रोनाल्डोची गर्लफ्रेन्ड जॉर्जिना रॉड्रिगेज हिचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला आहे. रोनाल्डो आणि जॉर्जिनाची पहिली भेट 2016 साली झाली होती. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, बुर्ज लेकवर लाइट आणि लेझर शो आयोजित करणे खूप महाग आहे. तीन मिनिटांच्या व्हिडिओ किंवा संदेशासाठी सुमारे 50 लाख रुपये आकारले गेले आहे. त्याचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना आवडल्याचं दिसून येतंय. कारण रोनाल्डोचे या ठिकाणच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय. रोनाल्डोला जॉर्जिनापासून एक मुलगा झाला आहे. हे कुटुंब सध्या दुबईमध्ये वीकेंड हॉलिडे साजरा करत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday celebration, Football, Sports