मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

FIFA WC 2022: धक्कादायक... वर्ल्ड कप दरम्यान रोनाल्डोवर मोठी कारवाई, 'या' कारणामुळे दोन सामन्यांची बंदी

FIFA WC 2022: धक्कादायक... वर्ल्ड कप दरम्यान रोनाल्डोवर मोठी कारवाई, 'या' कारणामुळे दोन सामन्यांची बंदी

रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी

रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी

FIFA WC 2022: पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंडमधल्या एका स्पर्धेत चाहत्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 24 ऑक्टोबर: कतारमधल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या साखळी फेरीचे सामने सुरु आहेत. पहिल्या काही सामन्यात मोठमोठे उलटफेरही पाहायला मिळाले. त्यात स्टार फुटबॉलर लायनल मेसीच्या अर्जेन्टिनाला सौदी अरेबियाकडून पराभवाचा धक्का मिळाला. तर दुसऱ्या एका सामन्यात जपाननं 4 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या जर्मनीला धूळ चारली. त्यात आता याच स्पर्धेतला आणखी एक स्टार खेळाडू पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंडमधल्या एका स्पर्धेत चाहत्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

सप्टेंबरमधल्या त्या कृतीची शिक्षा 

मॅन्चेस्टर युनायटेडकडून खेळताना इंग्लंडमधल्या स्थानिक एफए कप स्पर्धेत रोनाल्डोकडून ही चूक घडली होती. सप्टेंबर महिन्यात झालेला हा सामना रोनाल्डोच्या मॅन्चेस्टर युनायटेडनं गमावला होता. त्यावेळी रोनाल्डोनं ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना एचा चाहत्याचा फोन रागानं जमिनीवर आपटला होता. या कृतीबाबत रोनाल्डोनं माफीही मागितली होती. पण याप्रकरणी एफए कप आयोजकांनी नुकताच 50 हजार पाऊंडचा दंड आणि दोन सामन्यांची बंदी अशी शिक्षा सुनावली आहे.

वर्ल्ड कपदरम्यान बंदी नाही

दरम्यान रोनाल्डोवर घालण्यात आलेली बंदी ही केवळ एफए कप स्पर्धेपुरती मर्यादित राहिल. फिफा वर्ल्ड कपमध्ये त्याला पोर्तुगालकडून खेळता येणार आहे. दरम्यान कतार फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालचा समावेश ग्रुप H मध्ये आहे. या ग्रुपमधला पोर्तुगालचा पहिला सामना घानाविरुद्ध आज रात्री 9.30 वाजता होणार आहे. घानासह या गटात उरुग्वे आणि दक्षिण कोरिया हे संघ आहेत.

हेही वाचा - FIFA WC 2022: जपाननं फक्त मॅच नाही तर मनंही जिंकली... जगाला दिला 'हा' महत्वाचा संदेश, पाहा Video

रोनाल्डोचा मँँचेस्टर युनायटेडला गुडबाय

यंदाच्या फिफा वर्ल्ड कपसाठी कतारमध्ये दाखल होताच रोनाल्डोनं एक धक्कादायक निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वी मँचेस्टर युनायटेडमध्ये दाखल झालेल्या रोनाल्डोनं धक्कादायकरित्या क्लबला गुडबाय केला. वर्ल्ड कपदरम्यान रोनाल्डोच्या या निर्णयामुळे फुटबॉल विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे आता जगातला हा स्टार फुटबॉलर वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतो याकडे अवघ्या फुटबॉलविश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

First published: