मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

... तोपर्यंत रिटायर होणार नाही, फुटबॉल फॅन्सना रोनाल्डोने दिली गूड न्यूज!

... तोपर्यंत रिटायर होणार नाही, फुटबॉल फॅन्सना रोनाल्डोने दिली गूड न्यूज!

 फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एका पुरस्कार वितरण सोहळ्यात आपला निवृत्तीचा काही प्लॅन नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एका पुरस्कार वितरण सोहळ्यात आपला निवृत्तीचा काही प्लॅन नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एका पुरस्कार वितरण सोहळ्यात आपला निवृत्तीचा काही प्लॅन नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

लिस्बॉन, 22 सप्टेंबर : जगातला सर्वांत आघाडीचा फुटबॉलपटू (Football Player) म्हणून ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे (Cristiano Ronaldo) पाहिलं जातं. फुटबॉलच्या मैदानावर रोनाल्डोला पाहणं ही फुटबालप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. युरो 2024 मध्ये रोनाल्डो खेळणार की नाही अशी धाकधूक फुटबॉल चाहत्यांना वाटत होती; पण एका पुरस्कार वितरण सोहळ्यात (Award Ceremony) रोनाल्डोनं सध्या आपल्या निवृत्तीचा काही प्लॅन नसल्याचं स्पष्ट केलं आहे. युरो 2024 पर्यंत आपण फुटबॉल खेळत राहणार असल्याचं त्याने स्वतःच सांगितल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी लिस्बनमध्ये (Lisben) पोतुर्गाल फुटबॉल फेडरेशनच्या (FPF- Portuguese Football Federation) वतीने एका पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या रोनाल्डोचा त्यात सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रोनाल्डो म्हणाला, 'माझा फुटबॉल खेळण्याचा प्रवास अद्याप थांबलेला नाही. मी वर्ल्ड कप (World cup) आणि युरो स्पर्धेत (Euro) सहभागी होऊ इच्छितो. या स्पर्धांसाठी मी फार उत्सुक असून लक्ष्यही (Target) निश्चित केलेलं आहे.' पोर्तुगालसाठी केले 117 गोल रोनाल्डोनं त्याच्या पूर्ण करिअरमध्ये पोर्तुगालसाठी 189 मॅचेसमध्ये 117 गोल केले आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोनं त्याच्या नावे केला होता. आयर्लंडविरुद्ध (Ireland) गोल करताना त्याने इराणचा महान फुटबालपटू अली दाईचा 109 गोल्सचा विक्रम मोडीत काढला. दरम्यान, कतारमध्ये नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत रोनाल्डो त्याच्या देशाच्या टीमकडून खेळताना पाहायला मिळेल. रोनाल्डोची ही दहावी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहे. मॅन्चेस्टर युनायटेडसोबत असणार का रोनाल्डो? रोनाल्डो सध्या मॅन्चेस्टर युनायटेडकडून (Manchester United F.C.) क्लब फुटबॉल खेळतो. मागच्या हंगामात त्याने आपल्या या क्लबसाठी बहारदार खेळी केली होती; पण मागच्या वर्षी युनायटेड क्लबची एकूण कामगिरी मात्र तितकीशी चांगली नव्हती. यंदा नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच रोनाल्डो युनायटेड सोडू शकतो, अशीही चर्चा होती; मात्र अद्याप त्याने क्लब सोडलेला नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते सर्वच देशांत आहेत. त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. मैदानावर खेळताना रोनाल्डो हवेत उडी मारतो तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. जगभरात अनेक सामाजिक कार्यांतही त्याचा सहभाग असतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. त्याने कामगिरीत राखलेलं सातत्य वाखाणण्यासारखं आहे.
First published:

Tags: Football, Sports

पुढील बातम्या