कॅप्टन कुलच्या अडचणीत वाढ, एम. एस धोनी विरोधात गुन्हा दाखल

कॅप्टन कुलच्या अडचणीत वाढ, एम. एस धोनी विरोधात गुन्हा दाखल

एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत असताना आता धोनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : क्रिकेटपासून गेले तीन-चार महिने दूर असलेला महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का? असा सवाल चाहत्यांना पढला आहे. यातच धोनीनं आयपीएलमध्ये खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता धोनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. धोनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण धोनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्रापाली समुहाच्या वादात पुन्हा एकदा धोनीचे नाव समोर आले आहे. मात्र आता आलेल्या बातम्यांनुसार धोनीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळं त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 27 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी आर्थिव गुन्हे शाखेनं एफआयर दाखल केली आहे, यात धोनीचेही नाव समोर आले आहे. 2003मध्ये आम्रपाली समुहानं लोकांकडून पैसे घेऊन त्यांना घर दिले नव्हते. त्यामुळं या कंपनीवर 42 हजार घरे बुडवल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्यात या समुहानं चक्क 2 हजार 647 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. मुख्य म्हणजे आम्रपाली समुहाचा ब्रँड अँबेसडर धोनी होता.

याआधी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार आम्रपाली समुहानं 6 कोटी 52 लाख रुपये रिती स्पोर्ट्स प्रा.लि. कंपनीत बेकायदेशीरपणे वळवले. दरम्यान, या कंपनीचे सर्वात जास्त शेअरर्स हे धोनीच्या नावावर आहेत. आम्रपाली समुहानं रिती स्पोर्ट्स कंपनीत पैसे गुंतवण्याआधी एक करार केला होता. यात ही कंपनी धोनीला तीन दिवसांसाठी आम्रपाली कंपनीच्या कार्यक्रमासाठी तयार करेल. दरम्यान त्यानंतर या समुहानं धोनीला आपल्या कंपनीचे ब्रँडअँबेसडर केले.

वाचा-मातेला सलाम! रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बालकाचे स्वीकारले पालकत्व

धोनीवर लावण्यात आले आहेत हे आरोप

आउटलुक इंडियानं दिलेल्या बातमीनुसार 27 नोव्हेंबरला धोनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोनीवर घर खरेदी करणाऱ्यांनी आरोप केला आहे. आरोपपत्रात धोनीनं आम्रपाली ग्रुपची जाहीरात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं आरोपींच्या लिस्टमध्ये धोनीचे नाव समोर आले आहे.

वाचा-एका दिवसात होणार 971 खेळाडूंचा लिलाव, लागणार कोट्यावधींची बोली

धोनीनं केला होता पैसे थकवल्याचा आरोप

धोनीनं काही महिन्यांपूर्वी या ग्रुप विरोधात न्यायालयात फसवणुकीची तक्रार केली होती. धोनी ब्रँड अँबेसडर असताना, या समुहासाठी केलेल्या प्रमोशनचे पैसे न दिल्याचा आरोप यात केला होता. या कंपनीनं धोनीचे 40 कोटी रुपये थकवले आहेत. 2009मध्ये धोनीनं आम्रपाली समूहासाठी प्रमोशन करण्यात सुरुवात केली. मात्र, 2016 मध्ये आम्रपाली कंपनीवर फसवणुकीचे आरोप केले जाऊ लागले तेव्हा धोनी स्वतः या ग्रुपपासून वेगळा झाला.

वाचा-लिलावाआधीच संकटांचे ढग! दिग्गज खेळाडू म्हणाला ‘IPLमध्ये आता मजा नाही’

46 हजार खरेदीदारांनी फसवणारी आहे ही कंपनी

आम्रपाली कंपनीवर आरोप आहेत की त्यांनी 46 हजार खरेदीदारांना वेळेवर घर दिले नाही. त्यामुळं न्यायालयानं कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. आम्रपाली ग्रुपवर 38.65 कोटी रुपये आणि त्यावर व्य़ाज 16.25 कोटी रुपयांची थकीत आहे. धोनीनं आपल्या याचिकेत या पैशांची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 05:02 PM IST

ताज्या बातम्या