हिरो ते झिरो! फक्त 12 बॉलमध्ये बदललं श्रीलंकेच्या बॉलरचं नशिब

एकाच मॅचमध्ये आयुष्यातील संस्मरणीय कामगिरी आणि नकोशी कामगिरी करण्याचे दुर्दैवी प्रसंग खूप कमी जणांच्या वाट्याला आले आहेत. श्रीलंकेचा ऑल राउंडर अकिला धनंजय (Akila Dananjaya) याची या यादीमध्ये भर पडली आहे

एकाच मॅचमध्ये आयुष्यातील संस्मरणीय कामगिरी आणि नकोशी कामगिरी करण्याचे दुर्दैवी प्रसंग खूप कमी जणांच्या वाट्याला आले आहेत. श्रीलंकेचा ऑल राउंडर अकिला धनंजय (Akila Dananjaya) याची या यादीमध्ये भर पडली आहे

  • Share this:
    मुंबई, 04 मार्च :  एकाच मॅचमध्ये आयुष्यातील संस्मरणीय कामगिरी आणि नकोशी कामगिरी करण्याचे दुर्दैवी प्रसंग खूप कमी जणांच्या वाट्याला आले आहेत. श्रीलंकेचा ऑल राउंडर अकिला धनंजय (Akila Dhananjaya) याची या यादीमध्ये भर पडली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये फक्त 12 बॉलमध्ये धनंजयचं नशिब पूर्ण बदललं. वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावण्याचा विक्रम केल्यानं  धनंजय सर्वांच्या लक्षात राहणार आहे. मात्र त्यापूर्वी त्यानं एक पराक्रम देखील केला होता. धनंजय बनला होता हिरो श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 9 आऊट 131 रन केले होते. वेस्ट इंडिजनं 132 रनचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केली. लिंडल सिमन्स आणि एव्हिन लुईस यांनी फक्त 20 बॉलमध्ये 52 रनची पार्टरनरशिप केली होती. मॅचच्या चौथ्या ओव्हरमध्ये धनंजयनं एव्हिन लुईस (28), ख्रिस गेल (0) आणि निकोलस पूरन (0) असं तिघांना सलग आऊट करुन हॅट्ट्रिक (Hat-trick)  घेतली होती. हिरोचा झाला झिरो धनंजयनं वेस्ट इंडिजच्या तीन स्फोटक बॅट्समनना आऊट केलं होतं. त्याच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेनं मॅचमध्ये कमबॅक केलं. त्यामुळे मॅचमधील सहावी ओव्हर देखील त्यालाच सोपवण्याचा निर्णय श्रीलंकेचा कॅप्टन एंजलो मॅथ्यूजनं घेतला होता. सहाव्या ओव्हरमध्ये धनंजयच्या समोर पोलार्ड बॅटींग करत होता. पोलार्डनं धनंजयनं आधीच्याच ओव्हरमध्ये घेतेल्या हॅट्ट्रिकचं कोणतंही दडपण घेतलं नाही. त्यानं त्याच्या ओव्हरमध्ये एक किंवा दोन नाही तर सलग सहा सिक्स लगावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स लगावणारा पोलार्ड तिसराच बॅट्समन बनला. त्याचबरोबर एका ओव्हरमध्ये सहा सिक्स देण्याचा नकोसा रेकॉर्ड करणारा धनंजय हा देखील तिसराच बॉलर बनला आहे. त्यामुळे एकाच मॅचमध्ये हिरो ते झिरो असा प्रवास धनंजयनं केला. (हे वाचा- 6,6,6,6,6,6! एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावणारा पोलार्ड बनला तिसरा खेळाडू, पाहा VIDEO ) पोलार्डनं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारत विजय वेस्ट इंडिजच्या आवाक्यात आणला होता. वेस्ट इंडिजनं 43 बॉल आणि 4 विकेट्स राखून श्रीलंकेला पराभूत केलं. त्याचबरोबर तीन मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: