PHOTOS : IPL खेळणारे 'हे' चार खेळाडू बलात्कार प्रकरणी होते दोषी

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरवर चक्क झोपलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप.

  • Share this:

इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये वोरसेस्टरशायरकडून खेळणाऱा ऑस्ट्रेलियन खेळाडू बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. अॅलेक्स हेपबर्नवर झोपलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. 1 एप्रिल 2017 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी वेरसेस्टर क्राउन कोर्टाने त्याला दोषी ठरवले आहे.

न्युझीलंडचा खेळाडू स्कॉट कुग्लिन जो सध्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात आहे, त्याच्यावरही बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. 2015 साली कुग्लिनवर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. दोन वर्षांनंतर कुग्लिनची याप्रकरणी निर्दोष मुक्तता झाली.

साऊथ आफ्रिकेचे दिग्गज गोलंदाज असलेले मखाया एंटिनी यांच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1999 साली आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात करणाऱ्या एंटिनीच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. एंटिनीही चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएल खेळले आहेत.

सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल खेळणारा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याच्यावरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. बंगळुरू पोलिसांनी मिश्राला अटकही केली होती. आपल्या तक्रारीत पिडीत महिलेनं मिश्राला याला हॉटेलमध्ये भेटायला गेले असता, त्यानं लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पण त्यानंतर काही दिवसांनी या महिलेनं आपला आरोप मागे घेतले होते.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ल्युक पॉमर्सबैकला 2012 साली भारतात अटक केली होती. ल्युक बंगळुरू आणि पंजाब संघासाठी खेळला आहे. त्याच्यावर प्रेयसीला मारहाण व तिचं शोषण केल्याचा आरोप होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 14, 2019 12:00 AM IST

ताज्या बातम्या