मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'.... तर मी देशाकडून कधीच खेळू शकलो नसतो', धोनीनं केला खुलासा

'.... तर मी देशाकडून कधीच खेळू शकलो नसतो', धोनीनं केला खुलासा

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याला कोणत्या कारणामुळे टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली याचा खुलासा केला आहे.

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याला कोणत्या कारणामुळे टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली याचा खुलासा केला आहे.

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याला कोणत्या कारणामुळे टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली याचा खुलासा केला आहे.

    मुंबई, 2 जून :  कॅप्टन म्हणून आयसीसीच्या तीन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणारा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा एकमेव भारतीय आहे. धोनीनं 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो फक्त चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) आयपीएल स्पर्धेत खेळतो. त्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत याचा अनुभव आला आहे. महेंद्रसिंह धोनीनं नुकतीच तामिळनाडूतील थिरूवल्लूर क्रिकेट अकादमीला भेट दिली. यावेळी त्यानं त्याच्या क्रिकेटच्या आठवणी सांगितल्या. 'मी जिल्हा पातळीवर खेळलो नसतो तर कदाचित कधीही देशाकडून खेळू शकलो नसतो,' असं धोनी यावेळी म्हणाला. 'मी पहिल्यांदाच एका जिल्हा क्रिकेट संधटनेच्या यशाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहे. मी माझ्या जिल्हा क्रिकेट संघाचा (रांची) आभारी आहे. क्रिकेटपटूंना त्यांच्या जिल्हा क्रिकेट टीमबद्दल अभिमान हवा. मला देशाकडून खेळल्याचा, देशाचं प्रतिनिधित्व केल्याचा अभिमान आहे. मी जिल्हा किंवा शालेय पातळीवर खेळलो नसतो तर हे कधीही शक्य झाले नसते.' असे धोनीने यावेळी सांगितले. चेन्नई सुपर किंग्सचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे देखील या कार्यक्रमाला धोनीसोबत उपस्थित होते. दीपक चहर नाही तर 'या' क्रिकेटपटूच्या लग्नाला पोहचला राहुल, Photo Viral धोनीनं पुढच्यावर्षी देखील खेळणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे. 'चेन्नईमध्ये न खेळता निरोप घेणे, चुकीचे ठरेल. मुंबईमध्ये मला खेळाडू म्हणून तसंच टीम म्हणून खूप प्रेम आणि आपुलकी मिळती. पण, तो सीएसकेच्या फॅन्सशी अन्याय असेल. पुढच्या वर्षी टीमना वेगवेगळ्या जागी खेळण्याची संधी मिळेल अश आशा आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी जाऊन आभार मानता येतील. मी पुढच्या वर्षी दमदार पुनरागमनासाठी कठोर परिश्रम करणार आहे.' असं धोनीनं चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यांत सांगितलं होतं.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, MS Dhoni

    पुढील बातम्या