क्रिकेटपटूवर बंदीची कारवाई, पत्नीचा VIDEO होतोय व्हायरल?

क्रिकेटपटूवर बंदीची कारवाई, पत्नीचा VIDEO होतोय व्हायरल?

क्रिकेटपटूला 3 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

कराची, 29 एप्रिल : पकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल याच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 3 वर्षांची बंदी घातली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचार प्रकरणी अकमलची पीसीबीच्या समितीकडून गेल्या काही महिन्यांपासून चौकशी कऱण्यात येत होती. दरम्यान, अकमलवर बंदीची कारवाई करण्यात आली असून आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ 2019 मधील असल्याचा दावा करण्यात येत असून त्यामध्ये एक महिला जेवण पॅक करत असल्याचं दिसतं. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेदरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगताना संबंधित महिला ही उमर अकमलची पत्नी आहे असाही दावा केला जात आहे. एका सामन्यावेळी पाकचा दिग्गज खेळाडू अब्दुल कादिरची मुलगी आणि उमर अकमलची पत्नीने जेवण चोरल्याचा आरोप कऱण्यात आला होता.

एका युजरनं म्हटलं की, नूर अम्ना ही  अब्दुल कादिर यांची मुलगी आणि उमर अकमलची पत्नी आहे. कराची नॅशनल स्टेडियममध्ये जेवणाची चोरी करताना कॅमेऱ्यात कैद. व्हायरल व्हिडिओमध्ये जरी ती महिला उमर अकमलची पत्नी असल्याचा दावा केला असला तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र तरीसुद्धा अकमलच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओची चर्चा होत आहे.

वाचा : LIVE मॅचमध्ये बिघडलं होतं केदारचं पोट आणि..., हरभजनने सांगितला मजेदार किस्सा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अकमलवर कारवाई केली आहे. त्याने पाकिस्तान टी20 लीगमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. अकमलनं पाकिस्तानकडून 16 कसोटी सामने आणि 121 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय 84 टी20 सामन्यातही त्यानं पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

हे वाचा : 'रोहित शर्मा गाढव आहे कारण...', का उडवली युवराजनं हिटमॅनची खिल्ली?

संपादन - सूरज यादव

First published: April 29, 2020, 6:10 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या