सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

रैनाच्या नात्यातील काही व्यक्तींवर प्राणघात हल्ला करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळणारा सुरेश रैना (Suresh Raina) कौटुंबिक कारणामुळे युएईमधून भारतात परतला आहे. सुरैश रैना आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी नसणार, हे निश्चित झालं आहे. रैनाच्या नात्यातील काही व्यक्तींवर प्राणघात हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत. याच कारणामुळे रैनाने आयपीएलमधून बाहेर पडत पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

पठानकोटमधील थरियाल या गावात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर मध्यरात्री धारधार शस्त्रांनी हल्ला झाला. हे कुटुंब आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केल्याची माहिती आहे.

या हल्ल्यात रैनाचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला असून काकू आशा देवी या गंभीर झाल्या आहेत. सध्या आशा देवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्या मृत्यूशी झुंज देत असल्याचं समजते.

दरम्यान, याप्रकरणी सुरेश रैनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सुरेश रैना यंदाच्या आयपीएल सीझनमधून बाहेर पडत असल्याची माहिती CSK चे सीईओ केएस विश्वनाथन यांनी 29 ऑगस्ट रोजी दिली आहे. तसंच संपूर्ण टीम रैनाच्या कुटुंबासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून सुरेश रैना आयपीएलसाठी मोठी मेहनत घेत सराव करत होता. 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रैनाचं पूर्ण लक्ष आता आयपीएलवरच होतं. रैनाच्या आक्रमक फलंदाजीचा सीएसकेला चांगलाच फायदा झाला असता. मात्र कौटुंबिक कारणामुळे सुरेश रैना माघारी परतल्याने संघाला धक्का बसला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2020, 11:49 PM IST

ताज्या बातम्या