सचिनची '10' क्रमांकाची जर्सी निवृत्त, पुढे कुणालाही वापरता येणार नाही !

सचिनची '10' क्रमांकाची जर्सी निवृत्त, पुढे कुणालाही वापरता येणार नाही !

बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'जर्सी क्रमांक 10' ही 'अनौपचारिकरित्या' निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

29 नोव्हेंबर : आपल्या सगळ्यांचा लाडका क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 2013मध्ये निवृत्त झाला आणि आता तो जी '10 क्रमांकाची जर्सी' घालायचा  आता सुद्धा निवृत्त होणार आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'जर्सी क्रमांक 10' ही 'अनौपचारिकरित्या' निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियातला कोणताही खेळाडू ही जर्सी घालू शकणार नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरताना नेहमी 10 क्रमांकाची जर्सी घालून खेळायचा.  हीच 10 क्रमांकाची जर्सी घालून त्याने अनेक सामने जिंकले आणि म्हणूनच त्याला सन्मान देण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

सचिन 2013ला क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाला. त्याच्या 24 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये प्रत्येक सामन्यात 10 क्रमांकाची जर्सी सचिनची खास ओळख ठरली.

त्याने शेवटची जर्सी घातली ती 10 मार्च 2012 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात. सचिनच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूने ही 10 नंबरची जर्सी घातली नाही. ऑगस्ट 2017 मध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने कोलंबोमध्ये आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 अंकी जर्सी घातली होती पण शार्दुल काही विशेष खेळू शकला नाही. फक्त एकदिवसीय सामना खेळूनच तो बाद झाला.  त्यामुळे 10 क्रमांकाचा जर्सी फक्त सचिनसाठीच होता आणि तो घालून सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम रचले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 02:08 PM IST

ताज्या बातम्या