टीम इंडियातील खेळाडूनं धोनीला सुनावले खडेबोल, आता घेतला यू-टर्न!

टीम इंडियातील खेळाडूनं धोनीला सुनावले खडेबोल, आता घेतला यू-टर्न!

धोनीच्या निवृत्तीवर भारतीय संघातून सध्या बाहेर फेकला गेलेल्या मनोज तिवारीने कठोर प्रतिक्रीया दिली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : वर्ल्ड कप 2019नंतर माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती जाहीर करेल, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेत लष्कारात ट्रेनिंग करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान धोनीच्या निवृत्तीवर भारतीय संघातून सध्या बाहेर फेकला गेलेल्या मनोज तिवारीने कठोर प्रतिक्रीया दिली होती.

मनोज तिवारीनं, भारतीय संघ ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, असं म्हणत मनोज तिवारीने धोनीला आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं आहे. दरम्यान आता तिवारीनं यु-टर्न घेत ट्वीट करत याबाबत स्पष्टिकरण दिले आहे. चाहत्यांनी तिवारीला केलेल्या विरोधानंतर त्यानं हे स्पष्टिकरण दिले. धोनीने आतापर्यंत आपल्या देशासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. भारतीय संघाला सर्वोत्तम बनवण्यामध्येही त्याचं योगदान आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरनेही धोनीने आता विश्रांती घ्यायला हवी असं म्हटलं होतं.

मात्र मनोज तिवारीनं धोनीवर केलेल्या टीकेनंतर त्याला चाहत्यांनी अनेक खडेबोल सुनावले. म्हणून त्यानं, "इंटरनेटवर तुम्ही जे वाचता त्यावर विश्वास ठेवू नका फक्त कोणच्या फोटो शेजारी काही लिहिले आहे, म्हणजे ते त्या माणसाचे मत नाही. तुम्ही इंटरनेटवर जे वाचता ते खरे आहे का, हे सुध्दा तपासा", असे ट्वीट केले आहे.

धोनी कर्णधार असतानाच तिवारीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याला संघातील जागा टिकवून ठेवता आली नाही. याआधी तिवारीनं वेस्ट इंडिज दौऱ्यात जागा न मिळाल्यामुळं नाराजी व्यक्त केली होती.

वाचा-फक्त धोनीची नाही तर पंत घेणार 'या' फलंदाजीची सुध्दा जागा, सेहगानं केला खुलासा

काय होते मनोजचे खळबळजनक विधान

धोनीच्या कामगिरीमध्येही आता कमालीची घसरण झाली आहे, आणि हे एका किंवा दोन सामन्यांमध्ये होतंय अशातला भाग नाहीये. जे खेळाडू चांगली कामगिरी करतील ते संघात राहतील, ज्यांची कामगिरी खराब असेल त्यांना आपली जागा गमवावी लागेल. धोनीला कोणत्या आधारावर निवड समिती संघात स्थान देतेय हे माहिती नाही. देशात अजुनही गुणवान खेळाडू आहेत, त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. भारतीय संघ ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाहीये, आपण देशासाठी खेळतोय ही भावना कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मनोज तिवारीने धोनीच्या निवृत्तीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

वाचा-'अनुष्कामुळेच मी सरळमार्गी झालो', विरुष्कानं पुन्हा एकदा दिले कपल गोल्स!

असे आहे मनोज तिवारीचे करिअर

रणजी क्रिकेटमध्ये पश्चिम बंगाल संघाचे कर्णधारपद भुषवणाऱ्या मनोज तिवारीनं 2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, 2015मध्ये झिम्बावे विरोधात त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यात त्यानं 12 एकदिवसीय सामन्यात 26च्या सरासरीनं 287 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 3 सामने खेळले आहेत.

वाचा-फक्त 13 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला 'हा' खेळाडू झाला टीम इंडियाचा बॅटिंग कोच!

VIDEO: भाजप जिंकलं तरी मंत्रिमंडळ आमचंच, सुप्रिया सुळेंनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 07:00 PM IST

ताज्या बातम्या