Home /News /sport /

क्रिकेटच्या मैदानातून थेट सिनेमाजगतात धोनीची एंट्री, साक्षीनं सांगितला प्लॅन

क्रिकेटच्या मैदानातून थेट सिनेमाजगतात धोनीची एंट्री, साक्षीनं सांगितला प्लॅन

साक्षी आणि धोनी यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2010मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. आता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

साक्षी आणि धोनी यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2010मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. आता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

क्रिकेटनंतर आता धोनी मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी सज्ज आहे. धोनी अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खास शैलीनं आणि हेलकॉप्टर शॉटनं लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र निवृत्तीनंतरही धोनी आयपीएलमध्ये खेळून लोकांचे मनोरंजन करत आहे. आता धोनी खरच मनोरंजन जगतात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटनंतर आता धोनी मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी सज्ज आहे. धोनी अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. धोनीची पत्नी साक्षीनं (Sakshi Dhoni) याबाबत माहिती दिली. धोनी आता पौराणिक विज्ञान (mythological sci-fi web-series) वेब सीरिजवर काम करणार आहे. या सीरिजचा धोनी निर्माता असणार आहे. साक्षीनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून यासंबंधी माहिती जाहीर केली आहे. वाचा-IPL 2020 : अबु धाबीमध्ये झहीरची मराठीत शिकवणी, मुंबईच्या बॉलरला खास टिप्स वाचा-IPL 2020 : आईने मोल मजुरी करून मोठं केलं, मुलगा गाजवतोय आयपीएल साक्षीने नुकतेच माध्यमांशी बोलताना याबद्दल सांगितले. साक्षी म्हणाली की, ही सीरिज sci-fi आहे. एका बेटावर उच्च-तंत्रज्ञानाच्या सुविधांमध्ये अडकलेल्या अघोरींची ही कथा असेल. साक्षीने सांगितले की, सीरिजमध्ये, अघोरींबाबतचे रहस्य सांगण्यात आले आहे. त्या नंतर अस्तित्वात असलेल्या बर्‍याच श्रद्धा कायमचे बदलल्या जाऊ शकतात. या मालिकेसाठी स्टारकास्टचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, एक गोष्ट यावेळी साक्षीने स्पष्ट केली, ती म्हणजे, या मालिकेत विशिष्ट गोष्टींकडे लक्ष दिले जाईल आणि प्रत्येक पात्र अचूक शैलीत दर्शविण्याचा प्रयत्न करेल. वाचा-IPL 2020 : या दोन खेळाडूंच्या फॉर्मचं मुंबईला टेन्शन, रोहित टीम बदलणार? धोनीपूर्वीही अनेक भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आहे, ज्यात विनोद कांबळी, अजय जडेजा अशा अनेक नावांचा समावेश आहे. त्यापैकी कोणालाही यश मिळवता आले नाही. दरम्यानस यापूर्वी धोनीच्या कंपनीने 'शेर ऑफ द लायन' हा माहितीपट तयार केला होता. यात चेन्नई सुपर किंग्जचा संघर्ष दर्शविला गेला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या