धक्कादायक! नेटमध्ये सराव करताना इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

धक्कादायक! नेटमध्ये सराव करताना इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

क्रिकेटच्या विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अवघ्या 24 वर्षांच्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. जोशुआ डाऊनी (Cricketer Josh Downie) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : क्रिकेटच्या विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अवघ्या 24 वर्षांच्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. जोशुआ डाऊनी (Cricketer Josh Downie) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. जोशुआ ग्रेट ब्रिटन ऑलिम्पियन जिम्नॅस्ट बेकी (Great Britain Olympian gymnasts Becky )आणि एली यांचा भाऊ आहे. जॉशच्या अकाली निधनामुळे चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी जॉशला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सीपीआर (CPR) दिला होता. मात्र, त्याचा मृत्यू झाला. जोश नुकताच नॉटिंगहॅमला (Nottingham) राहायलागेला होता. तिथे तो खेळाचा शिक्षक म्हणून काम पाहत होता. जॉशच्या मृत्यूमुळे मला धक्का बसलाय,अशी प्रतिक्रीया त्याची आई हेलन यांनी व्यक्त केली.

जॉश खूपच हुशार आणि सुंदर होता. मला त्याची कायम आठवण येईल, असं म्हणत जोशच्या 57 वर्षाच्या आईने त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या बीबीसीशी बोलत होत्या. नेटमध्ये सराव करत असताना तो अचानक अडखळला आणि खाली कोसळला. त्यानंतर त्याला सीपीआर देऊन रुग्णालयात दाखल केलं. मात्र तो परत शुद्धीवर आलाच नाही, असं त्यांनी भावनिक होऊन सांगितलं.

सप्टेंबर 2020 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तो त्याच्या नवीन नोकरीसाठी नॉटिंगहॅमला आला होता. जॉश आमच्यातून निघून गेलाय यावर माझा विश्वासच बसत नाही. जुलै महिन्यात तो 25 वर्षांचा झाला असता. जॉश आमच्यावर, त्याच्या गर्लफ्रेंडवर (girlfriend), खेळावर (sport) आणि प्राण्यांवर खूप प्रेम करायचा, असंही त्याच्या आईने सांगितलंं. आम्ही नेहमीच सोबत खूप चांगला वेळ घालवायचो, असंही हेलन म्हणाल्या.

जॉशची बहीण बेकी (Becky)म्हणाली, की आमचं संपूर्ण कुटुंब कोणत्या दुःखातून जातंय याबद्दल मी सांगू शकत नाही. हे जग कधीकधी खूप निर्दयी आणि क्रूर वाटतं. जॉश तू खूप चांगला भाऊ होतास. आपण नेहमीच'डाउनी5' राहू.

Cricketer Josh Downie Dies After Collapsing During Net Session

जॉश नॉटिंगहॅमशायर मधील (Nottinghamshire) हकनल सीसी (Hucknall CC), फिक्सेर्टन (Fikserton) आणि थर्गर्टन सीसी (Thurgarton CC)आणि बर्टन जॉयस सीसी (Burton Joyce CC) यासह अनेक क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळला होता.

नॉटिंगहॅमशायर क्रिकेट बोर्ड प्रीमियर लीगने (Nottinghamshire Cricket Board Premier League ) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “24वर्षाच्या जॉश डाउनीच्या निधनाची बातमी ऐकून एनपीएलमधील प्रत्येकजण धक्क्यात आहे. या कठीण काळात आम्ही जॉशच्या कुटुंबीयांसोबत आहोत.” क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूला हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना या आधी भारताततही अनेकदा घडल्या आहेत. त्यापैकी काहींचा जीव वाचवण्यात यश आलं, पण काहींनी मैदानावरच प्राण सोडला होता.

First published: May 11, 2021, 5:11 PM IST

ताज्या बातम्या