चेन्नई, 11 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने चेन्नईच्या व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चेन्नईस्थित व्यावसायिकने अटकपूर्व जामिनासाठी मद्रास हायकोर्टात केल्यानंतर प्रकरण चर्चेत आले आहे.
जी. महेश या चेन्नईच्या व्यावसायिकाने चेन्नई सुपर किंग्जची संघात असलेल्या हरभजनची भेट घेतली आणि कर्जाच्या स्वरुपात 4 कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर महेश यांना लोन स्वपरुपात दिलेली रक्कम हरभजनने परत मागितली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर त्याने हरभजनला दिलेला 25 लाखाचा चेक देखील 18 ऑगस्ट रोजी खात्यामध्ये कमी रक्कम असल्यामुळे बाउन्स झाला. त्यामुळे चिडलेल्या भज्जीने याबाबत चेन्नई पोलिसांत तक्रार केली आहे.
वाचा-...म्हणून पाणीपुरी विकणाऱ्या खेळाडूला राजस्थान संघाने 2.40 कोटींना विकत घेतलं
महेश यांना चौकाशीसाठी हजर राहण्याची बजावली नोटीस
के . सुरेंदर आणि चेतउरी पुगझेनधी या वकिलाद्वारे जी. महेश यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाबरोबर जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात जी. महेश याच्या म्हणण्यानुसार 2015 मध्ये थळंबूर येथील जमिन मी तारण म्हणून हरभजन याच्या नावे केली आहे. याचे कागदपत्र देखील हरभजन याच्या नावे आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वाचा-मोठी बातमी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बॅन होऊ शकतो दक्षिण आफ्रिकेचा संघ
IPLमधून भज्जीने घेतली माघार
दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीगचा भाग असलेल्या हरभजन सिंगने या स्पर्धेतून अचानक माघार घेतली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला कि, या वर्षी मी आयपील खेळण्याचा विचार केला नाही. या कोरोनाच्या कठीण काळात आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासोबत राहणं पसंत करत आहे. हरभजन सिंग आपल्या परिवारासोबत पंजाब येथील जालंधर येथे वास्तव्यास असून हरभजन सिंह याच्याबरोबर चेन्नईच्या सुरेश रैना याने देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे.