Home /News /sport /

Pushpa चित्रपटातील सामी-सामी’ गाण्यावर थिरकल्या Warner च्या मुली, अल्लू अर्जुन दिली कमेंट

Pushpa चित्रपटातील सामी-सामी’ गाण्यावर थिरकल्या Warner च्या मुली, अल्लू अर्जुन दिली कमेंट

David Warner

David Warner

दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फंलदाज डेव्हिड वॉर्नर(David Warner)ने अल्लू अर्जुनच्या या चित्रपटातील गाण्यावर आणि डायलॉगवर रील्स बनवले होते. आता त्याच्या मुलींनी रश्मिका मंदाना च्या ‘सामी-सामी’ भन्नाट डान्स केला आहे.

  नवी दिल्ली, 25 जानेवारी: साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa The Rise) चांगलाच गाजत आहे. अनेकांना या चित्रपटातील गाण्यांनी, डायलॉगने वेड लावले आहे. दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फंलदाज डेव्हिड वॉर्नर(David Warner)ने अल्लू अर्जुनच्या या चित्रपटातील गाण्यावर आणि डायलॉगवर रील्स बनवले होते. आता त्याच्या मुलींनी रश्मिका मंदाना च्या ‘सामी-सामी’ भन्नाट डान्स केला आहे. त्याच्या मुलींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून विशेष म्हणजे अल्लू अर्जुनही खूश झाला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील संवाद, गाणी आणि स्टाइल लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लोक कॉपी करत आहेत. यामध्ये वॉर्नरसह त्याच्या मुलींचाही सहभाग आहे. त्याच्या मुली रश्मिका मंदनाच्या ‘सामी-सामी’ गाण्यावर थिरकल्या आहेत.
  या डान्सचा व्हिडिओ स्वत: डेव्हिड वॉर्नरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने मजेशीर कॅप्शनही दिली आहे. 'आई आणि वडिलांच्या आधी या मुलींना ‘सामी-सामी’ गाण्यावर डान्स करायचा होता. या पोस्टसोबत वॉर्नरनं हसणारे इमोजीही शेअर केले आहेत.'' वॉर्नरच्या मुलींसा डान्स पाहून अल्लू अर्जूनही भलताच खूश झाला आहे. त्याने खूप क्यूट. अशी कमेंट करत दोन हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Allu arjun, David warner

  पुढील बातम्या