मुंबई, 19 नोव्हेंबर: टी20 क्रिकेटमध्ये आंद्रे रसेल हे नाव चांगलच प्रसिद्ध आहे. एक स्फोटक फलंदाज म्हणून रसेलकडे पाहिलं जातं. आयपीएलसह जगातल्या व्यावसायिक टी20 लीगमध्ये रसेलचा चांगलाच दरारा आहे. पण हाच रसेल मैदानातल्या नव्हे तर मैदानाबाहेरच्या एका कारनाम्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियात रसेलनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. पण शॉपिंग मॉलमधल्या या फोटोत तो पूर्णपणे निर्वस्त्र आहे. याच फोटोमुळे सध्या क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
रसेलच्या इन्स्टा स्टोरीने उडवली खळबळ
रसेलनं काल आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला होता. पण त्यावर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. शॉपिंग मॉलमधल्या एका वॉर्डरोब सेक्शनमध्ये त्यानं हा सेल्फी काढलाय. पण या सेल्फीमुळे इंटरनेटवर मात्र मोठा हंगामा झाला.
रसेलची तुलना रणवीरशी
सोशल मीडियात मात्र या फोटोची तुफान चर्चा झाली. अनेकांनी रसेलच्या या फोटोची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगशी केली आहे. कारण रणवीरनंही काही महिन्यांपूर्वी असंच न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याची संपूर्ण देशात मोठी चर्चा झाली होती. त्यावरुन रणवीरला विरोधाचाही सामना करावा लागला होता.
Cricket Fans to Andre Russell rn:#nakedِ pic.twitter.com/FafpNqsSTl
— फिलासफर©™ (@battyphilo) November 18, 2022
हेही वाचा - BCCI: बीसीसीआयची 'स्वच्छता मोहीम' सुरु... निवड समिती बरखास्तीनंतर घेणार 'हे' मोठे निर्णय
केकेआरचा हुकमी एक्का रसेल
रसेलचं भारतात मोठं फॅन फॉलोईंग आहे. ख्रिस गेलनंतर कॅरेबियन खेळाडूंमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला रसेल आयपीएलमध्ये सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. रसेलला यंदाच्या ऑक्शनआधी केकेआरनं रिटेन केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Ipl, Sports