मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'गर्लफ्रेंडसोबत फिरायचंय 300 रुपये द्या'; क्रिकेटप्रेमीनं खेळाडूकडे मागितले पैसे, पाहा काय मिळालं उत्तर

'गर्लफ्रेंडसोबत फिरायचंय 300 रुपये द्या'; क्रिकेटप्रेमीनं खेळाडूकडे मागितले पैसे, पाहा काय मिळालं उत्तर

amit mishra

amit mishra

सोशल मीडियावर सेलिब्रिटीनं आपल्याशी संवाद साधावा असं प्रत्येक फॅनला वाटत असतं. बहुतांश वेळा फॅन्सचा हिरमोडही होतो. पण काही वेळा मात्र फॅन्सने केलेली मागणी पूर्णही होते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : आवडता अभिनेता, अभिनेत्री किंवा एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात नेमकं काय घडत आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. सेलिब्रिटीही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सशी जोडले गेल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर सेलिब्रिटीनं आपल्याशी संवाद साधावा असं प्रत्येक फॅनला वाटत असतं. बहुतांश वेळा फॅन्सचा हिरमोडही होतो. पण काही वेळा मात्र फॅन्सने केलेली मागणी पूर्णही होते. याची प्रचिती भारतीय क्रिकेट टीमचा स्पिनर अमित मिश्राच्या बाबतीत आली. अमितला त्याच्या एका चाहत्यानं गर्लफ्रेंडला फिरवायचं असून, 300 रुपये द्या, अशी मागणी ट्विटरवर केली. अमितनंही त्याला चक्क 500 रुपये पाठवले व डेटसाठी शुभेच्छाही देऊन टाकल्या. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

सोशल मीडियावर क्रिकेट खेळाडूंना फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अमित मिश्रालाही प्रचंड फॉलोअर्स आहेत. एकदा ऑनलाइन असताना त्याला आश्चर्यचकित करणारी मागणी केली गेली. त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी अमितनं ती पूर्णही केली.

हेही वाचा -  IND vs SA : रोहित शर्मानं केला मोठा रेकॉर्ड, धोनीला मागे टाकून बनला नंबर 1

त्याचं झालं असं की, भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू सुरेश रैना सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झालेला आहे. तो इंडिया लीजंड्स टीममधून खेळतोय. सेमी फायनल सामन्यात रैनानं ऑस्ट्रेलिया लीजंड्सविरुद्ध डाइव्ह मारत एक सर्वोत्तम कॅच घेतला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अमित मिश्रानं तो व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना अमितनं त्याखाली एक संदेश लिहिला. यात ‘भाई सुरेश रैना, मी तुमच्याकडून टाइम मशीन उधार घेऊ शकतो का? आज तुमची फिल्डिंग पाहून जुने दिवस आठवले. तुम्हाला असं फिल्डिंग करताना पाहणं खरचं मंत्रमुग्ध करणारं आहे.’ याच व्हिडिओला प्रतिक्रिया देताना चाहत्याने पैशांची मागणी केली होती.

चाहत्याची काय होती प्रतिक्रिया

अमित मिश्रानं जेव्हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर हँडवरून शेअर केला तेव्हाच फॅनने पैसे मागितले होते. यात त्याने लिहिलं होतं की, ‘सर, गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचयं 300 रुपये ट्रान्सफर करा.’ हे ट्विट पाहून एका दुसऱ्या युजरने त्या चाहत्याला UPI नंबर मागितला. त्यानं यूपीआय देताच अमित मिश्रानं त्या युजरला 500 रुपये पाठवले व त्याचा स्क्रिनशॉट काढून शेअर केला. पैसे पाठवले असून, डेटसाठी तुला शुभेच्छा, असंही अमितनं या ट्विटमध्ये म्हटलंय.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये योगदान

अमित मिश्रानं त्याच्या करिअरमध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये योगदान दिलंय. यात 22 टेस्ट, 36 वन-डे, 10 टी-20 इंटरनॅशनल मॅचेस त्यानी खेळल्या आहेत. यात टेस्ट करिअरमध्ये 76, वन-डेमध्ये 64 आणि टी-20 मध्ये अमितने 16 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्ट प्रकारात त्यानं 4 हाफ सेंच्युरीही केल्या असून, 32 मॅचेसमध्ये 648 रन्सही केल्या आहेत

First published:

Tags: Cricket, Social media, Sports