• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारतीय क्रिकेटपटूचं लाजीरवाणं कृत्य, गावात केली घाण

भारतीय क्रिकेटपटूचं लाजीरवाणं कृत्य, गावात केली घाण

अनेकवेळा क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी कचरा न करण्याचं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करताना दिसतात, पण अशाच सेलिब्रिटी कचरा पसरवण्याप्रकरणी दोषी आढळल्या तर ते लाजीरवाण ठरतं.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : अनेकवेळा क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी कचरा न करण्याचं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करताना दिसतात, पण अशाच सेलिब्रिटी कचरा पसरवण्याप्रकरणी दोषी आढळल्या तर ते लाजीरवाण ठरतं. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजानेही (Ajay Jadeja) अशाच प्रकारचं कृत्य केलं आहे. अजय जडेजाने गावात कचरा केल्यामुळे त्याच्यावर 5 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू अजय जडेजा उत्तर गोव्यातल्या नाचिनोला गावात कचरा केल्याप्रकरणी दोषी आढळला. अजय जडेजाचा बंगला अल्डोनामध्ये आहे. शेजारच्या गावातल्या सरपंचाने दिलेल्या माहितीनुसार अजय जडेजाने कचरा नाचिनोला गावात फेकला, तसंच त्याने कोणताही वाद न करता 5 हजार रुपयांचा दंड भरला. गावच्या सरपंच असलेल्या तृप्ती बांदोडकर यांनी सांगितलं, 'आम्ही गावातल्या घाणीच्या साम्राज्यामुळे हैराण झालो आहोत. बाहेरचा कचराही गावात टाकला जात आहे. आम्ही गावातल्या युवकांना कचरा साफ करायला आणि ज्यानी कचरा केला त्याचा शोध घ्यायला पाठवलं. एका कचऱ्याच्या बॅगमधून अजय जडेजाचं नाव समोर आलं. यापुढे असं न करण्याची ताकीद आम्ही त्याला दिली आहे, यानंतर जडेजाने दंड भरण्याची तयारी दर्शवली. आमच्या गावात एवढा मोठा क्रिकेटपटू राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे, पण त्यांनी नियम पाळायला हवा.' 50 वर्षांचा अजय जडेजा भारताकडून 15 टेस्ट आणि 196 वनडे खेळला. वनडेमध्ये त्याच्या नावावर 6 शतकं आहेत, तसंच त्याने 5,359 रनही केल्या. जडेजा सध्या क्रिकेट एक्सपर्ट म्हणून चाहत्यांना दिसतो.
  Published by:Shreyas
  First published: