क्रिकेटमध्ये यापेक्षा वाईट काळ असू शकत नाही, दोन खेळाडूंनी घेतली निवृत्ती

क्रिकेटमध्ये यापेक्षा वाईट काळ असू शकत नाही, दोन खेळाडूंनी घेतली निवृत्ती

ICC च्या एका निर्णयाने झिम्बाम्बेच्या 30 क्रिकेटपटूंची कारकिर्द उद्ध्वस्त झाली.

  • Share this:

लंडन, 20 जुलै : ICC च्या एका निर्णयानं झिम्बाम्बे क्रिकेटचं भविष्यच अंधारात गेलं. तिथल्या क्रिकेटपटूंचे करिअर जवळपास संपुष्टात आल्यासारखं झालं आहे. संघातील दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. आय़सीसीने झिम्बाम्बे सरकारकडून तिथल्या क्रिकेट बोर्डात होणारा हस्तक्षेप न थांबल्यानं निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर झिम्बाम्बेच्या क्रिकेटपटूंनी हा निर्णय घेतला.

आयसीसीच्या निर्णयानंतर झिम्बाम्बे क्रिकेट संघ निराश आहे. अजुनही त्यांना आयसीसीकडून काही सकारात्मक पावले उचलली जातील अशी आशा आहे. संघाचा उपकर्णधार पीटर मूरने सांगितलं की, या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला आहे. आम्हाला वाटतं की आयसीसी झिम्बाम्बे क्रिकेटला एक संधी देईल.

पीटर मूर म्हणाला की, लहानपणापासून देशासाठी खेळण्याचं स्वप्न होतं. पण आता कोणीतरही पायाखालची जमीन काढून घेतल्यासारखं झालं आहे. मी नुकतीच वरिष्ठ खेळाडूंमध्ये जागा तयार करण्यास सुरुवात केली होती. माझ्यासाठी या पेक्षा वाईट वेळ असू शकत नाही.

झिम्बाम्बे क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर संघाचा खेळाडू सोलोमन मायरनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याबद्दल पीटर मूरने सांगितलं की, मी त्याच्याशी चर्चा केली होती. एखाद्या क्रिकेटपटूचं करिअर असं संपुष्टात आल्यानं वाईट वाटतं.

क्रिकेट खेळ नाही, 'या' देशानं नाकारला दर्जा!

पीटर मूरने 2014 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 8 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 19 टी 20 सामने खेळले होते. त्याने कसोटीत 533 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 827 तर टी 20 मध्ये 251 धावा केल्या आहेत.

दुखापतीनंतर क्रिकेट सोडून दुसऱ्याच आव्हानासाठी धवन मैदानात, VIDEO VIRAL

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

First published: July 20, 2019, 9:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading