Home /News /sport /

झिम्बाब्वेची टीम पाकिस्तान दौऱ्यावर, हा भारतीय प्रशिक्षक गेला नाही

झिम्बाब्वेची टीम पाकिस्तान दौऱ्यावर, हा भारतीय प्रशिक्षक गेला नाही

झिम्बाब्वे (Zimbabwe) ची क्रिकेट टीम पाकिस्तान (Pakistan)दौऱ्यावर पोहोचली आहे. पण झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) हे मात्र पाकिस्तानमध्ये गेले नाहीत.

    इस्लामाबाद, 20 ऑक्टोबर : झिम्बाब्वे (Zimbabwe) ची क्रिकेट टीम पाकिस्तान (Pakistan)दौऱ्यावर पोहोचली आहे. पण झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) हे मात्र पाकिस्तानमध्ये गेले नाहीत. झिम्बाब्वेची टीम इस्लामाबादमध्ये पोहोचल्यानंतर काही तासांनी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने राजपूत पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत, हे स्पष्ट केलं. 'लालचंद राजपूत यांना पाकिस्तानी दुतावासाकडून पाकिस्तानला जाण्याची कागदोपत्री सगळी परवानगी मिळाली होती. पण पाकिस्तानच्या प्रवासाबाबत भारतीय नागरिकांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार राजपूत यांना पाकिस्तानला पाठवण्यात येऊ नये, असं झिम्बाब्वेमधल्या भारतीय दुतावासाकडून आम्हाला सांगण्यात आलं,' असं झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. 'झिम्बाब्वेमधल्या भारतीय दुतावासाकडून झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिण्यात आलं आणि राजपूत यांना पाकिस्तान प्रवासातून सूट देण्यात यावी, असं सांगण्यात आलं. हरारेमध्ये असलेल्या पाकिस्तानी दुतावासाकडून राजपूत यांना व्हिजा देण्यात आला होता,' असं झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं. लालचंद राजपूत यांच्या गैरहजेरीत बॉलिंग प्रशिक्षक डगलस होंडो मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडतील. झिम्बाब्वे पाकिस्तानमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 2015 सालानंतर झिम्बाब्वे पहिल्यांदाच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. 2019 वर्ल्ड कपसाठी झिम्बाब्वे क्वालिफाय न झाल्यामुळे 58 वर्षांच्या लालचंद राजपूत यांना ऑगस्ट 2018 साली टीमचं मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं. 1985 ते 1987 या कालावधीमध्ये राजपूत भारतासाठी 2 टेस्ट आणि 4 वनडे मॅच खेळले. झिम्बाब्वेच्या टीमला पाकिस्तानला जायच्या आधी हरारेमध्ये पहिली कोरोना टेस्ट करावी लागली, यानंतर पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांना दुसरी कोरोना टेस्ट करावी लागली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या