मुंबई, 22 नोव्हेंबर : टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) टी20 वर्ल्ड कप टीममधून (T20 World Cup 2021) वगळण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी20 सीरिजमध्ये (India vs New Zealand) चहलनं टीम इंडियात पुनरागमन केलं. त्याला कोलकातामधील शेवटच्या मॅचमध्ये प्लेईंग 11 मध्ये संधी देखील मिळाली. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) चहलच्या कारकिर्दीबाबत भविष्यवाणी केली आहे.
कार्तिकनं सांगितलं की, युजवेंद्र चहल हा विदेशात देखील चांगला बॉलर आहे. पुढच्या वर्षी टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे त्यावेळी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 'क्रिकबझ' शी बोलताना कार्तिक पुढे म्हणाला की, 'चहल ऑस्ट्रेलियामध्ये जाणार याची मला खात्री आहे. रोहित शर्माचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. त्यांच्यामध्ये फक्त मैदानाच्या बाहेर नाही, तर मैदानातही चर्चा होते हे मला माहिती आहे.
चहल एक बुद्धीबळ खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याकडं नेहमीच जास्त चाली असतात. तो नेहमीच इतरांपेक्षा काही पावलं पुढं असतो. माझ्या मते चहल एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडं कौशल्य आणि विविधता देखील आहे.' असे कार्तिकने स्पष्ट केले. न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये चहलनं मार्टीन गप्टीलची मोठी विकेट घेत न्यूझीलंडचे परतीचे सर्व दोर कापून टाकले.
बांगलादेशनं केलेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत, टीमसमोर वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचं संकट
न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टीलने 36 बॉलमध्ये 51 रन केले. गप्टीलशिवाय दुसऱ्या कोणत्याही न्यूझीलंडच्या बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही.अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 9 रन देत 3 विकेट घेतल्या. तर हर्षल पटेलला 2 आणि दीपक चहर, युझवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. भारताने दिलेल्या 185 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची टीम 111 रनवर ऑल आऊट झाली. टी20 क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा न्यूझीलंडवरील हा सर्वात मोठा विजय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india, Yuzvendra Chahal