वाढदिवशी युवराजने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केली प्रार्थना, म्हणाला...

वाढदिवशी युवराजने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केली प्रार्थना, म्हणाला...

भारताला 2011 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा आज वाढदिवस आहे. युवराजने त्याच्या वाढदिवशी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmers Protest) प्रार्थना केली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भारताला 2011 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा आज वाढदिवस आहे. 39 वर्षांचा झालेल्या युवराजने त्याच्या वाढदिवशी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmers Protest) प्रार्थना केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेतून मार्ग काढण्यात यावा, अशी अपेक्षा युवराजने केली आहे. सोबतच युवराजने कोरोना व्हायरसच्या काळात काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.

'जन्मदिवस एखादी इच्छा किंवा महत्ताकांक्षा पूर्ण करण्याची संधी असते. पण वाढदिवस साजरा करण्याऐवजी मी प्रार्थना करतो, आमचे शेतकरी आणि आपल्या सरकारमध्ये चर्चा होऊन मार्ग निघेल. शेतकरी भारताची जीवनरेषा आहेत, यात कोणतंही दुमत नाही. पण अशी कोणतीही समस्या नाही, जी शांततापूर्ण संवादातून सोडवली जाऊ शकत नाही,' असं युवराज त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

वडिलांच्या वक्तव्यामुळे निराश

दुसरीकडे युवराज सिंगने त्याचे वडील योगराज सिंग यांनी केलेल्या वक्तव्यावरही उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसंच कोरोना काळात सावध राहा, असं आवाहनही त्याने जनतेला केलं. शेवटी त्याने जय जवान, जय किसान, जय हिंद असंही लिहिलं.

पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी नव्या कृषी कायद्याला विरोध करत आहेत. दिल्ली सीमेवर हे शेतकरी आंदोलन करत आहेत. नव्या कृषी कायद्यातून एमएसपी संपवण्यात आली तर त्यांची शेती मोठ्या उद्योगपतींच्या हातात जाईल, असा दावा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढलेल्या विजेंदर सिंह याने खेल रत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.

Published by: Shreyas
First published: December 12, 2020, 5:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या