मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

6,6,6,6,6,6 युवराज सिंहनं सांगितला 14 वर्षांपूर्वीचा इतिहास, 'त्या'आठवणी झाल्या जिवंत! पाहा VIDEO

6,6,6,6,6,6 युवराज सिंहनं सांगितला 14 वर्षांपूर्वीचा इतिहास, 'त्या'आठवणी झाल्या जिवंत! पाहा VIDEO

2007 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहनं एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स (Yuvraj Singh hits 6 sixes in a over) विक्रम केला होता. या ऐतिहासिक कामगिरीला रविवारी 14 वर्ष झाली. त्यानिमित्तानं युवराजनं क्रिकेट फॅन्सना एक खास भेट दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 सप्टेंबर :  दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहनं एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स (Yuvraj Singh hits 6 sixes in a over) विक्रम केला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दरबनमध्ये झालेल्या मॅचमध्ये युवराजनं ही कामगिरी केली. त्यानं इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले होते. या ऐतिहासिक कामगिरीला रविवारी 14 वर्ष पूर्ण झाले. या निमित्तानं संपूर्ण क्रिकेट विश्वानं युवराजच्या त्या विक्रमाच्या आठवणी जगावल्या. युवीनं देखील या निमित्तानं एक खास भेट क्रिकेट फॅन्सना दिली आहे. त्यानं 14 वर्षांपूर्वीचा इतिहास एका व्हिडीओच्या माध्यमातून जिवंत केला आहे. युवराजनं एक खास व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं तो बॅटींगला येण्यापूर्वीपासून ते स्टुअर्ट ब्रॉडला लगावलेल्या सहा सिक्सपर्यंतचे सर्व बारकावे सांगितले आहेत. ब्रॉडच्या ओव्हरपूर्वी इंग्लंडचा ऑल राऊंडर फ्लिंटॉफशी युवराजचा वाद झाला होता. त्यावेळी युवराज मैदानात काय म्हणाला? हे देखील त्यानं सांगितलं आहे. तसंच त्या ऐतिहासिक इनिंगच्या वेळी दुसऱ्या बाजूला असलेल्या धोनीसोबत त्याचं काय संभाषण झालं हे देखील या व्हिडीओतून क्रिकेट फॅन्सना पहिल्यांदाच समजले आहे. '6 सिक्सची कहानी युवी की जुबानी, माझ्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय वाटत? आता पुढे बॉलिवूड ? स्टुअर्ट ब्रॉड हे फक्त..' असं लक्षवेधी कॅप्शन युवराजनं त्या व्हिडीओला दिलं आहे. युवराज सिंहचा खास व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा दरम्यान, आयसीसीनं (ICC) रविवारी युवराजनं एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत या आठवणींना उजाळा दिला आहे. युवराज सिंह बनला 'सिक्सर किंग', ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये लगावले होते 6,6,6,6,6,6 युवराजनं इंग्लंड विरुद्धच्या त्या टी20 मॅचमध्ये फक्त 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्याच्या या वादळी खेळीमुळे भारतानं इंग्लंडचा पराभव केला होता. टीम इंडियानं नंतर तो टी20 वर्ल्ड कप देखील जिंकला. पण, त्यानंतर मागील 14 वर्षात पुन्हा हा वर्ल्ड कप जिंकण्यात भारतीय टीम अपयशी ठरली आहे. आता पुढील महिन्यात होणारा वर्ल्ड कप जिंकून ही प्रतीक्षा संपवण्याची संधी विराट कोहलीच्या टीमला आहे.
First published:

Tags: Cricket news, Yuvraj singh

पुढील बातम्या