युवराजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा करणार षटकारांची बरसात!

युवराजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा करणार षटकारांची बरसात!

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचा खेळ बघायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जून : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग लवकरच परदेशातील एका टी 20 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. युवराज कॅनडातील ग्लोबल टी20 लीगमध्ये खेळणार आहे. त्याला टोरंटो नॅशनल्सच्या संघाने घेतलं आहे. यासाठी किती रक्कम युवराजला मिळणार हे मात्र समजू शकले नाही. निवृत्तीची घोषणा करताना त्याने टी20 लीगमध्ये खेळणार असल्याचं सांगितलं होतं. यासाठी त्याने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती.

कॅनडातील ग्लोबल टी20 लीगमध्ये सहा संघ आहेत. यामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळताना दिसतील. या लीगचा दुसरा हंगाम आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसी, जे पी ड्युमिनी, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसेल, किरन पोलार्ड, सुनील नरेन, डेरेन सॅमी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन, ब्रेंडन मॅक्युलम, कुलीन मुनरो, ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लीन, जॉर्ज बेली, बेन कटिंग, पाकिस्तानचा शोएब मलिक, श्रीलंकेचा थिसारा परेरा हे खेळाडू असणार आहेत.

निवृत्तीची घोषणा करताना युवराजने परदेशी टी20 लीगमध्ये खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. त्याने म्हटलं होतं की, मला टी 20 खेळायचं आहे. या वयात मी मनोरंजनासाठी क्रिकेट खेळू शकतो. मी आता आयुष्याचा आनंद घेणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलबद्दल विचार करणं तणावपूर्ण असल्यांच युवराज म्हणाला होता.

बीसीसीआयच्या नियमांनुसार भारतात क्रिकेट खेळणारे परदेशी टी 20 लीगमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. याआधी निवृत्ती घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि जहीर खान हे क्रिकेटपटू युएईमध्ये झालेल्या टी 10 लीगमध्ये खेळले आहेत. तर इरफान पठाण कॅरेबियन क्रिकेटमध्ये भाग घेणारा पहिला खेळाडू ठरला होता. तो प्रथम श्रेणीत खेळत असून त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतलेली नव्हती.

World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनला, पण ती प्रियकरासोबत पळाली

First published: June 20, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading